Sambhaji Bhide | संभाजी भिडेंची मिशी कापा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा; कुणी केली घोषणा?

Sambhaji Bhide | टीम महाराष्ट्र देशा: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

करमचंद गांधी हे महात्मा गांधी यांचे खरे वडील नसून त्यांचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

याआधी देखील भिडे यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेली आहे. या पार्श्वभूमीवर समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी मोठी घोषणा केली आहे.

समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची मिशी कापणाऱ्याला तब्बल 01 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

संभाजी भिडे महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर ते देशामध्ये अशांतता प्रसरवण्याचं काम करताना देखील दिसत आहे.

त्यामुळे संभाजी भिडे यांची मिशी कापणाऱ्याला ओबीसी समाज वर्गणी करून एक लाख रुपयाचं  बक्षीस देणार असल्याचं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे.

Mahatma Gandhi’s real father was a Muslim landlord – Sambhaji Bhide

दरम्यान, मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल मोठं आणि वादग्रस्त विधान केलं आहे.

“महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नाही. करमचंद गांधी त्या काळात एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला जात होते. एक दिवस करमचंद गांधी त्या मुस्लीम जमीनदाराची मोठी रक्कम घेऊन पळून गेले.

त्यामुळे त्या मुस्लिम जमीनदाराने रागाच्या भरात त्यांच्या पत्नीला म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळवून आणलं आणि त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला.

त्यामुळं महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे” असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.