Narendra Modi | पुणे: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (1 ऑगस्ट) पुण्यामध्ये येणार आहे. पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहे. मोदींच्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील पुण्यामध्ये हजर झाले आहे.
Opposition will protest Narendra Modi’s visit to Pune by showing black flags
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पहिल्यांदाच एका व्यासपीठावर दिसणार आहे.
शरद पवारांनी मोदींसोबत एका मंचावर जाऊ नये, असं मत महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केलं आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील मंडई परिसरात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार आहे.
या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोधक काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) पुणे दौऱ्यावर ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून खोचक टीका केली आहे.
“देश मोदींच्या हुकूमशाहीविरुद्ध लढतोय व त्या लढयासाठी ‘इंडिया’ ही आक्रमक आघाडी तयार झाली आहे. श्री. शरद पवार हे त्या आघाडीतले महत्वाचे शिलेदार आहेत.
मोदी पुण्यात असताना तिकडे संसदेत दिल्ली सरकारचे लोकशाही अधिकार खतम करून, सर्वोच्च न्यायालयाचा न्याय तुडवत विधिमंडळाच्या अधिकारावर आक्रमण करणारे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आणले जात आहे.
हे हुकूमशाही वृत्तीचे विधेयक आणणारे श्री. मोदी हे स्वातंत्र्याचे सेनानी लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार घेतील व श्री. शरद पवार संसदेत विधेयकास विरोध करण्यास हजर राहण्याऐवजी मोदींना पुरस्कार देतील हे पवारांच्या चाहत्यांना आवडणार नाही.
देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे. अशा वेळी श्री. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळया अपेक्षा आहेत”, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | “मोदी कालपर्यंत ज्यांना भ्रष्ट मानत होते ते आज…”; ठाकरे गटाची मोदींवर खोचक टीका
- Sambhaji Bhide | साईबाबांची लायकी तपासा आणि मग पूजा करा – संभाजी भिडे
- Sambhaji Bhide | संभाजी भिडेंची मिशी कापा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा; कुणी केली घोषणा?
- Chitra Wagh | “अडीच वर्ष घरकोंबडा बनून राहणारे…”; चित्रा वाघांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
- Amol Mitkari | संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “मनू आजही जिवंत…”