Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे दौऱ्यावर आहे. मोदींना आज लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी पुण्यात येत आहेत. मोदींच्या या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असं मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विट चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार मिळतोय याचं उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना पोटशूळ आलंय.
या पुरस्काराच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि शरद पवार यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. लोकमान्य टिळकांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार ही तुम्हाला सहन होत नाही ? ही कसली विकृती.
पुरस्काराला जायला नको सांगत सर्वज्ञानी संजय राऊतांनी लोकमान्य टिळकांचा अवमान केला आहे. ज्यांनी स्वराज्याचा नारा देत इंग्रजांशी लढा दिला, त्यांच्यावर ठाकरेंचे गुलाम आक्षेप घेत आहेत हे दुर्देव आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार मिळतोय याचं उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना पोटशूळ आलंय….@uddhavthackeray
या पुरस्काराच्या निमित्तानं पंतप्रधान @narendramodi नरेंद्रजी मोदी आणि @PawarSpeaks शरद पवार यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. लोकमान्य टिळकांच्या…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 1, 2023
Narendra Modi has accused Sharad Pawar – Sanjay Raut
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या पुणे दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली (Chitra Wagh) आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी कुठे जावं, हे आम्ही ठरवत नाही.
ते देशात कुठेही जाऊ शकतात. मात्र मोदींनी ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ते सगळे नेते आज मोदींसोबत एकाच व्यासपीठावर दिसणार आहे.
म्हणजे मोदींनी केलेले आरोप खोटे होते का? मोदींनी शरद पवारांवर आरोप केले आहे. त्याचबरोबर त्यांचा पक्ष फोडला आहे. त्यामुळं शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाणं योग्य नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | शरद पवारांनी मोदींच्या कार्यक्रमाला जाणं अयोग्य – संजय राऊत
- Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोधकांचा विरोध; दाखवणार काळे झेंडे
- Uddhav Thackeray | “मोदी कालपर्यंत ज्यांना भ्रष्ट मानत होते ते आज…”; ठाकरे गटाची मोदींवर खोचक टीका
- Sambhaji Bhide | साईबाबांची लायकी तपासा आणि मग पूजा करा – संभाजी भिडे
- Sambhaji Bhide | संभाजी भिडेंची मिशी कापा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा; कुणी केली घोषणा?