Narendra Modi | पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये दाखल झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे स्वागत केलं.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदींच्या विरोधात आंदोलन केलं आहे. विरोधकांनी काळे झेंडे दाखवत मोदींच्या पुणे दौऱ्याचा निषेध केला आहे.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुण्यामध्ये दाखल झाले आहे. मोदींच्या या दौऱ्याला ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला आहे.
पुण्यातील मंडई परिसरात कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. या आंदोलनात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, रमेश बागवे यांच्यासह अनेक नेते सामील झाले होते.
पंतप्रधान मोदींचं (Narendra Modi) पुण्यात काय काम? मोदींनी मोदींनी मणिपूरला जायला हवं होतं, अशा घोषणा आंदोलनादरम्यान देण्यात आल्या आहे.
मोदींच्या पुणे दौऱ्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. कारण या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) एकाच व्याजपीठावर आले आहे.
शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असं मत महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केलं होतं. मात्र, तरीही शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Lokmanya Tilak National Award will be presented to Narendra Modi
दरम्यान, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने नरेंद्र मोदींना (Narendra Modi) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुण्यातील स.प महाविद्यालयाच्या मैदानावर हा पुरस्कार सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित आहे.
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | “टिळकांचे आणि गांधीजींचे वैचारिक मतभेद होते, मात्र…”; राज ठाकरेंचा मोदी-पवारांना टोला
- Opposition Leader | अखेर विरोधी पक्षनेता ठरला! ‘या’ नेत्याला मिळाली जबाबदारी
- Chitra Wagh | नरेंद्र मोदींना पुरस्कार मिळतोय याचं ठाकरे गटाला पोटशूळ आलंय – चित्रा वाघ
- Sanjay Raut | शरद पवारांनी मोदींच्या कार्यक्रमाला जाणं अयोग्य – संजय राऊत
- Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोधकांचा विरोध; दाखवणार काळे झेंडे