Opposition Leader | अखेर विरोधी पक्षनेता ठरला! ‘या’ नेत्याला मिळाली जबाबदारी

Opposition Leader | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.

त्यानंतर संख्याबळ जास्त असल्यामुळं काँग्रेसकडं महाराष्ट्रातील विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद चालून आलं होतं. या पदासाठी अशोक चव्हाण (Ashok Chavan), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) या नेत्यांची नावं चर्चेत होती. अशात काँग्रेसनं आज विरोधी पक्ष नेत्याचं नाव जाहीर केलं आहे.

Vijay Wadettiwar has been given the responsibility of Leader of Opposition

राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते पद काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना मिळालं असल्याची माहिती समोर आली आहे.

विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. बाळासाहेब थोरात यांच्याकडं विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी राहणार आहे. अनेक बैठका आणि चर्चांनंतर काँग्रेसनं हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.

त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर विधानसभेचा नवा विरोधी पक्षनेता कोण असेल? असा प्रश्न निर्माण झाला होता.

काँग्रेसकडं जास्त संख्याबळ असल्यामुळं काँग्रेसनं विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकला होता. त्यानंतर आज काँग्रेसनं विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.