Share

Ajit Pawar | “महाराष्ट्राच्या विकासाठी मोदींनी नेहमी…”; अजित पवारांकडून मोदींचं तोंडभरून कौतुक

🕒 1 min readAjit Pawar | पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोदींना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर मोदींनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. या उद्घाटनाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोदींना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

या पुरस्कार सोहळ्यानंतर मोदींनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. या उद्घाटनाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमी मदत केली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Narendra Modi has always helped for the development works in Pune – Ajit Pawar

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “पुण्यामध्ये होणाऱ्या विकास कामांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी मदत केली आहे. त्याचबरोबर ते नेहमी महाराष्ट्रातील विकास कामाला सहकार्य आणि प्रोत्साहन देतात.

मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. तर आज दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन देखील त्यांच्याच हस्ते पार पडलं आहे.

मोदी महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमी मदत करत असतात. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.”

पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “पुणेकरांमध्ये भरपूर सहनशीलता आहे. कारण मेट्रो प्रकल्प सुरू असताना पुणेकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं.

परंतु, तुम्ही सगळ्यांनी हसत-हसत या समस्यांना तोंड देत तुमची सहनशीलता दाखवून दिली. कोरोना काळापासून ते आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी या कामात सहकार्य केलं आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करत आहोत. आता या सरकारमध्ये तीन इंजिन आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!