Share

Sharad Pawar | शरद पवारांनी अख्या भाषणात फक्त एका ओळीत केलं मोदींचं अभिनंदन; म्हणाले…

Sharad Pawar | पुणे: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर दिसले. मोदींना पुरस्कार मिळाल्यानंतर शरद पवार यांनी भाषण केलं. यावेळी बोलत असताना शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी एका ओळीत नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत … Read more

Published On: 

Sharad Pawar | पुणे: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर दिसले. मोदींना पुरस्कार मिळाल्यानंतर शरद पवार यांनी भाषण केलं. यावेळी बोलत असताना शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी एका ओळीत नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत त्यांचं अभिनंदन केलं.

यावेळी बोलत असताना शरद पवारांचा (Sharad Pawar) रोख छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या योगदानावरच होता. शरद पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला माहित आहे.

पुणे जिल्ह्यातील शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या मावळ्यांच्या मदतीनं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं.

हे छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य आणि रयतेचं राज्य आहे. देशातील जवानांनी देशाचं संरक्षण करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक केला होता. त्यानंतर हा विषय सर्वत्र चर्चेत आला होता.

मात्र, देशातील सर्वात पहिला सर्जिकल स्ट्राइक छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आहे. लाल महालात जेव्हा शाहिस्तेखान शिरला होता तेव्हा छत्रपती शिवरायांनी पहिला सर्जिकल स्ट्राइक केला होता.”

Mahatma Gandhi and Lokmanya Tilak were two eras – Sharad Pawar

पुढे ते (Sharad Pawar) म्हणाले, “भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सामान्य माणसाला जागृत करणं अत्यंत गरजेचं आहे हे लोकमान्य टिळकांना माहीत होतं. त्यामुळं त्यांनी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्र सुरू केली.

त्याचबरोबर टिळकांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव सुरू केला. त्या काळामध्ये महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक अशी दोन युग होती. या दोघांचही योगदान खूप मोलाचं आहे. देशाच्या नव्या पिढीनं या दोन्ही नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.”

“लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं महत्त्व अत्यंत वेगळा आहे. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार, बाळासाहेब देवसर, अटल बिहारी बाजपेयी अशा अनेकांना आजपर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे.

या यादीत आता पंतप्रधान मोदींचं नाव सामील झालं आहे. यासाठी मी सगळ्यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो”, असही ते (Sharad Pawar) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही