Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असं मत महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केलं होतं. मात्र, तरीही शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर आता शरद पवारांनी महाविकास आघाडीची बैठक बोलवली आहे.
Sharad Pawar has called a meeting of Mahavikas Aghadi in Mumbai
महाविकास आघाडीतील नेत्यांची इच्छा नसताना शरद पवारांनी (Sharad Pawar) आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये आंदोलन केलं.
यानंतर शरद पवारांनी मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक बोलवली आहे. 05 ऑगस्ट रोजी ही बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), नाना पटोले (Nana Patole) आदी नेते उपस्थित राहतील. आज घडलेल्या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदींना पुरस्कार मिळाल्यानंतर शरद पवार यांनी भाषण केलं.
यावेळी बोलत असताना शरद पवारांचा (Sharad Pawar) रोख छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या योगदानावर होता. तर पवारांनी भाषणाच्या शेवटी एका ओळीत नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत त्यांचं अभिनंदन केलं.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | शरद पवारांनी अख्या भाषणात फक्त एका ओळीत केलं मोदींचं अभिनंदन; म्हणाले…
- Narendra Modi | लोकमान्य टिळक पुरस्कारासह मिळणारी रक्कम गंगेला समर्पित करणार – नरेंद्र मोदी
- Eknath Shinde | “मोदी बुलंद भारताचं स्वप्न प्रत्यक्षात…” मुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींचं तोंडभरून कौतुक
- Narendra Modi | पुण्यात मोदींचं काय काम? मोदींच्या आगमनानंतर विरोधक आक्रमक
- Raj Thackeray | “टिळकांचे आणि गांधीजींचे वैचारिक मतभेद होते, मात्र…”; राज ठाकरेंचा मोदी-पवारांना टोला