🕒 1 min read
Narendra Modi | पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान मोदींना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केलं आहे. त्याचबरोबर आज पंतप्रधान आवास योजनेचं देखील लोकार्पण करण्यात आलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी भाषण केलं आहे.
Public transport needs to be modernized – Narendra Modi
नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, “आपल्याला लोकांना सुख-सुविधा पुरवायच्या असतील आणि शहरात राहणाऱ्या लोकांचा जीवनस्तर वाढवायचा असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टला अत्याधुनिक जोड देण्याची अत्यंत गरज आहे.
त्यामुळं देशातील अनेक शहरांमध्ये मेट्रोचा विस्तार केला जात आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी नवीन फ्लावरओव्हर बांधले जात आहे. देशामध्ये 2014 पर्यंत फक्त 250 किमी मेट्रो नेटवर्क होतं. आता तेच नेटवर्क 800 किमीपेक्षा अधिक झालं आहे. देशात सध्या 20 शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध आहे.”
पुढे बोलताना ते (Narendra Modi) म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर शहरांमध्ये मेट्रोचं काम सुरू आहे. पुण्यामध्ये ट्राफिक आणि प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार करणं खूप महत्त्वाचं आहे.
त्याचबरोबर पुणे शहरातील नागरिकांची कॉलिटी ऑफ लाइफ सुधारण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. कारण महाराष्ट्राचा विकास म्हणजे देशाचा विकास आणि देशाचा विकास म्हणजेच महाराष्ट्राचा विकास.”
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारासह मिळणारी रक्कम नरेंद्र मोदींनी गंगेला समर्पित केली आहे.
“लोकमान्य टिळक यांच्या नावात गंगा आहे, त्यामुळे त्यांच्या नावानं मिळणाऱ्या पुरस्काराची रक्कम मी गंगेला समर्पित करणार आहे. या पुरस्काराची रक्कम मी नमामि गंगे परियोजनासाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे”, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | शरद पवारांनी बोलवली महाविकास आघाडीची बैठक; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Sharad Pawar | शरद पवारांनी अख्या भाषणात फक्त एका ओळीत केलं मोदींचं अभिनंदन; म्हणाले…
- Narendra Modi | लोकमान्य टिळक पुरस्कारासह मिळणारी रक्कम गंगेला समर्पित करणार – नरेंद्र मोदी
- Eknath Shinde | “मोदी बुलंद भारताचं स्वप्न प्रत्यक्षात…” मुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींचं तोंडभरून कौतुक
- Narendra Modi | पुण्यात मोदींचं काय काम? मोदींच्या आगमनानंतर विरोधक आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










