Sanjay Raut | “पुढच्या सर्जिकल स्ट्राइकसाठी शरद पवार आमच्यासोबत…”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut | नवी दिल्ली: काल (1 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे दौऱ्यावर होते. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर दिसले होते.

या कार्यक्रमात बोलत असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दल भाष्य केलं होतं.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शत्रूंनी महाराष्ट्रावर जेव्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा-तेव्हा महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राइक झाला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या या कार्यक्रमावरून बरेच वाद निर्माण झाले आहे.

मात्र, त्या वादांवर आम्ही पडदा टाकणार आहोत. पण नक्कीच जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं, महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न झाला, महाराष्ट्राला कमजोर आणि अपमानित करण्यात आलं.

त्याचबरोबर जेव्हा-जेव्हा दिल्लीच्या शत्रूंनं महाराष्ट्रावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा-तेव्हा महाराष्ट्रानं सर्जिकल स्ट्राइक केला आहे. त्यामुळं पुढच्या सर्जिकल स्ट्राइकसाठी शरद पवार साहेब आमच्यासोबत नक्की राहतील.”

Central government has tried to weaken Maharashtra – Sanjay Raut

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “काल नरेंद्र मोदी पुण्यात आले, तेव्हा महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते होते.

त्याचबरोबर काल रस्त्यावर सर्व महाराष्ट्र विकास आघाडी आंदोलन करत होती. कालच्या आंदोलनातून महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहे.

केंद्र सरकारनं महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रात पक्ष फोडीचं राजकारण केलं आहे. हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय आहे. त्यामुळे जनतेच्या मनात तीव्र रोष आहे. म्हणूनच काल लोकं रस्त्यावर उतरले. ”

“निवडणुका जवळ आल्यामुळं प्रत्येक राज्यांमध्ये पेटवापेटवीचं राजकारण सुरू झालं आहे. प्रत्येक राज्याला आता दंगलींना सामोरं जावं  लागणार आहे.

भारतीय जनता पक्षाची निवडणुका आधी खेळली जाणारी ही जुनी रणनीती आहे. त्यामुळं आता फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला अशा प्रकारच्या घटनांना सामोरं जावं लागणार आहे”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.