Ambadas Danve | संभाजी भिडेंचं संरक्षण सरकार करतयं – अंबादास दानवे

Ambadas Danve | मुंबई: शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

महात्मा गांधीजींचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला होता.

त्याचबरोबर या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारनं भिडेंना संरक्षण दिलं असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

The state government is protecting Sambhaji Bhide – Ambadas Danve

विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यविरुद्ध महाविकास आघाडी आवाज उठवेल.

संभाजी भिडे यांचं संरक्षण राज्य सरकार करत आहे. कारण संरक्षणाशिवाय संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले, साईबाबा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं नसतं.”

पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले, “संभाजी भिडे महापुरुषांचा अवमान करत त्यांच्याबद्दल अभद्र बोलत आहे. त्याचबरोबर ते देव देवतांचा अपमान करत आहे.

मात्र, तरीही सरकार यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार असताना देव देवतांचा अपमान होताना दिसत आहे. सरकार भिडेंना संरक्षण का देत आहे? सरकारला महापुरुषांचा अपमान मान्य आहे का?”

“आज संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि नाना पटोले आमदारांचं मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे”, असही ते (Ambadas Danve) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.