Trupti Desai | मुंबई: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर टीका करत पोलीस तक्रार दाखल केली होती. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी उर्फीला नोटीस बजावली होती. अशा परिस्थितीत उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या प्रकरणामध्ये भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी आपले मत मांडले आहे.
या वादाला तृप्ती देसाई यांनी धार्मिक रंग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या आहे, “आपला देश संविधानावर चालतो. एखाद्याने काय परिधान करावे किंवा काय करू नये हा सर्वस्वी त्याचा निर्णय असतो. उर्फीच्या आधी देखील अनेक अभिनेत्रींनी बोल्ड कपडे घातलेले आहे. मात्र, त्यावर कधी कुणीच टीका केली नाही.” उर्फी जावेद मुस्लिम आहे म्हणून तिला टार्गेट केले जात आहे का? असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “कायदा हा सर्वांसाठी समान आहे. उर्फीप्रमाणेच दीपिका पदुकोन, कटरीना कैफ इत्यादी अभिनेत्री बोल्ड कपडे परिधान करतात. त्यामुळे जर कारवाई करायचीच असेल, तर सर्वांवर करा. विनाकारण उर्फीला कोणी टार्गेट करत असेल, तर आम्ही तिच्यासोबत आहोत.”
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. उर्फी जावेदला आंबोली येथील पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची पोलीस दखल घेत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Urfi Javed | ‘या’ फॅशनला काय नाव देणार? कपड्यांवरून वाद सुरू असताना उर्फीने केला Bold व्हिडिओ शेअर
- Government Scheme | पशुपालन आणि दुग्ध व्यवसायात मदत करतील सरकारच्या ‘या’ योजना, जाणून घ्या
- Skin Care | चेहऱ्यावरील निखार वाढवण्यासाठी वापरा बेसनाचे ‘हे’ स्क्रब
- Google Pay Refund | Gpay वर पेमेंट फेल झाले, पण रिफंड मिळाले नाही? तर करा ‘या’ पद्धती फॉलो
- IND vs SL | कर्णधार रोहित शर्मा संघात करणार मोठा बदल, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी