Share

Raj Thackeray | “नितीन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणारा…”; नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचं ट्विट

🕒 1 min readRaj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: कर्जत एडी स्टुडिओचे मालक आणि सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin …

पुढे वाचा

Published On: 

🕒 1 min read

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: कर्जत एडी स्टुडिओचे मालक आणि सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे.

त्यांच्या निधनानं सर्वांनाचं धक्का बसला आहे. त्याचबरोबर त्यांच्या निधनानंतर कलाविश्वासह राजकीय वर्तुळातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ट्विट करत राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही.

कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे.”

Nitin was a patient man – Raj Thackeray

पुढे ते (Raj Thackeray) म्हणाले, “नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल ?

त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे. असो,कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली.”

दरम्यान, कर्जतमध्ये नितीन देसाई यांचा भव्य एनडी स्टुडिओ (Raj Thackeray) होता. नितीन देसाई यांनी अनेक मालिकांसह चित्रपटांसाठी सेट उभे केले होते. त्यांनी ‘किक’, ‘जोधा अकबर’, ‘बालगंधर्व’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘प्रेम रतन धन पायो’ इत्यादी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या