Nitesh Rane | “महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपासून हिरवे किडे…”; नितेश राणेंचं सूचक विधान

Nitesh Rane | मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं. त्याचे पडसाद आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दिसून आले आहे.

याबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. देशामध्ये औरंग्यांचे लाड चालणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Chhatrapati Sambhaji Raja created history in Maharashtra – Nitesh Rane

नितेश राणे म्हणाले, “देशामध्ये औरंग्यांचे लाड चालणार नाही अशी भूमिका आम्ही स्पष्ट मांडली आहे. आमचं सरकार हे हिंदुत्ववादी आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये अनेक हिरवे किडे वळवळ करताना दिसत आहे.

ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी राजेंनी इतिहास घडवला त्या महाराष्ट्रामध्ये काही हिरवे कार्टे जिहादी आणि औरंगजेबाचे विचाराचे स्टेटस ठेवत आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “हे सर्व कृत्य करणाऱ्या लोकांना आपल्या भारताचं संविधान मान्य नाही का? या सर्व लोकांना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे कायदे मान्य आहे का? यांचं उत्तर त्यांनी आधी घ्यावं.

भारत माता की जय आणि वंदे मातरम आम्ही म्हणतो, असं ती लोक म्हणतात. दुसरा पर्याय नाही म्हणून म्हणतात का? पर्याय काय? त्यांनी फक्त नाही म्हणून दाखवाव बघू त्यांची जीभ जागेवर राहते का?”

यावेळी बोलत असताना नितेश राणे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले आहे. ते म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. कारण औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या लोकांच्या मागचा मास्टरमाईंड कोण? यासंदर्भात आम्ही चौकशी करू.

त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यासाठी आम्ही एटीएस आणि एसआयटी स्थापन करू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. म्हणून मी त्यांचे आभार मानतो.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.