Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांनी संभाजी भिडेंच्या सुरक्षेबद्दल थेट सादर केला पुरावा; पाहा VIDEO

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.

यानंतर सरकार भिडेंना संरक्षण देत असल्याचं विरोधकांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी पुरावा सादर केला आहे.

How much will the government lie? – Jitendra Awhad

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये संभाजी भिडे यांना सुरक्षा व्यवस्था पुरवल्याचं दिसत आहे.

यावरून ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सरकार म्हणतं, मनोहर भिडेला सुरक्षा नाही. खालील व्हिडिओ बघा.ते पुरावे आहेत…गेल्या आठवड्याभरामध्ये संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेमध्ये मनोहर भिडे अकोला आणि अमरावती येथे फिरत होते त्याचे. सरकार किती खोटं बोलणार?”

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचे (Jitendra Awhad) पडसाद दिसून आले आहे.

विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “राज्य सरकार संभाजी भिडेंना संरक्षण पुरवत आहे. कारण संरक्षणाशिवाय संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले, साई बाबा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं नसतं.

संभाजी भिडे महापुरुष आणि देव देवतांचा अपमान करत आहे. राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार असताना देवदेवतांचा अपमान होत आहे.” सरकार भिडेंना संरक्षण देत आहे का? सरकारला महापुरुषांचा अपमान मान्य आहे का? असं सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.