मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्ञान अमित शहा यांच्याकडून घेणे इतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नसल्याचे म्हणत संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी अमित शहा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘शिवाजी शिवाजी’ म्हणून एकेरी शब्दामध्ये केला आहे. ते छत्रपती आहेत. शिवाजी महाराज आहेत. या देशाच्या गृहमंत्र्यांना माहित नाही का? शिवाजीने यह किया, शिवाजीने ओ किया, ही भाषा आहे का तुमची? तुमची जीभ धडावते कशी महाराजांना अरे तुरे करायला? काय करत आहेत देवेंद्र फडणवीस? हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा. या विरोधात मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे.
देशाच्या गृहमंत्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा अभय आहे का? शिंदे गटाचे लोक कुठे आहेत? फालतू नकली हिंदुत्व वाले… हे डरपोक आणि भित्रे लोक आहेत. यांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम ढोंगी आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम रायगडावर करत आहात तर सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत. तर तुम्ही दोन्ही गाद्यांच्या वंशजांना निमंत्रण द्यायला पाहिजे होते, असं ते म्हणाले आहेत.
File a case against Amit Shah for insulting Chhatrapati Shivaji Maharaj – Sanjay Raut
संजय राऊत म्हणाले की, कुणी उंदीर म्हणू द्या. गाढव म्हणून द्या. म्हणून काय सत्य लपत आहे का?अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यांता शिवाजी म्हणून एकेरी उल्लेख केला. ते मला गाढव म्हणून हा अपमान लपणार आहे का? उंदीर आणि तुम्हाला कुडतरून ठेवलं आहे. आमची मेहनत आहे ना गाढवासारखी. तर आम्ही महाराष्ट्रासाठी गाढव मेहनतच करतो.
तुम्हाला लाज वाटली पाहिजे. छत्रपतींचा अपमान होतो आहे आणि तुम्ही माना डोलवत आहात. द्रोपदीचा वस्त्रहरण होताना जसे पांडव खाली मान घालून बसले होते तसे तुम्ही काल बसले होतात. मुख्यमंत्र्यांच्या समोर काल अपमान झाला आहे. छत्रपतींचा उल्लेख शिवाजी म्हणून एकेरीमध्ये करण्यात आला आहे. तो आम्ही कधीच करत नाही. औरंगजेबाच्या थडग्याला समाधी म्हणून उल्लेख करण्यात आला. देशाचे गृहमंत्री म्हणतात त्याला समाधी म्हणून मानले जाईल. हा अपमान नाही आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा? मग तुम्ही आता कडेलोट करणार आहात का? करा कडेलोट, असं वक्तव्य संजय राऊतांनी अमित शहांविषयी बोलताना केले आहे.
महत्वाच्या बातम्या