IPL 2025 मधील 27 व्या सामन्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर धावांचा पाऊस पडला. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत तब्बल 245 धावा फटकावत सामन्याला जोरदार सुरुवात दिली. मात्र हैदराबादने या आव्हानाचा सामना करताना केवळ 8 विकेट्स गमावत आणि 9 चेंडू राखून विजय मिळवला.
हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी अफाट फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांची पुरती धुलाई केली. अभिषेक शर्माने केवळ 55 चेंडूंमध्ये 141 धावांची वादळी खेळी साकारली, ज्यामध्ये त्याचे 14 चौकार आणि 10 षटकार होते. तर ट्रेविस हेडनेही 71 धावांची झंझावाती खेळी केली.
या सामन्याआधी सलग चार पराभव झालेल्या हैदराबादसाठी हा विजय मोठा आत्मविश्वास देणारा ठरला आहे. या विजयानंतर हैदराबादचा संघ गुणतालिकेत 8व्या स्थानावर पोहोचला आहे.
Abhishek Sharma’s Blazing 141 Powers SRH to Historic 245-Run Chase Against Punjab
पंजाब किंग्जने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना जोरदार सुरुवात केली. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह यांनी चांगली सुरवात करून दिली. कर्णधार श्रेयस अय्यरने 82 धावा, तर शेवटच्या षटकांत मार्कस स्टॉइनिसने झंझावात फटकेबाजी करत संघाला 245 पर्यंत नेलं. मात्र, हैदराबादच्या फलंदाजांनी त्यांच्या या प्रयत्नांवर पाणी फेरलं.
अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडची सलामीची जोडी मैदानात उतरल्यापासून आक्रमणाच्या मूडमध्ये दिसून आली. एकवेळ अभिषेक बाद झाला असं वाटत होतं, पण पंचांनी नो-बॉल दिल्याने त्याला संधी मिळाली, या संधीचे अभिषेकने सोनं केले. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी 171 धावांची भागीदारी केली. हेड बाद झाल्यानंतर अभिषेकने आघाडी घेतली आणि विजय निश्चित केला. शेवटी हेनरिक क्लासेनने नाबाद 21 धावा करत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
हैदराबाद संघ:
अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, ईशान किशन, नीतीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी, ईशान मलिंगा
पंजाब किंग्ज संघ:
प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहाल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंह, मार्को जेनसन, अर्शदीप सिंह, लॉकी फर्ग्युसन, युजवेंद्र चहल
हैदराबादच्या या ऐतिहासिक धावांचा पाठलागाने आयपीएलमध्ये पुन्हा एकदा नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या