भारतावर दुहेरी संकट! अभिषेकनंतर आता ‘हा’ स्टार खेळाडू जखमी; वर्ल्ड कपमध्ये खळबळ

नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी ईशान किशनला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. अभिषेक शर्माच्या फिटनेसबद्दल साशंकता असतानाच भारतावर हे दुहेरी संकट ओढवलं आहे.

Published On: 

Ishan Kishan Injury: वर्ल्ड कपमध्ये भारताला मोठा धक्का? सराव थांबवला!

एका संकटातून सावरत नाही तोच दुसरं संकट समोर उभं ठाकलं, तर काय अवस्था होते? सध्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची अवस्था काहीशी अशीच झाली आहे. कारण, नामिबियाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याआधीच भारताच्या गोटातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा आजारी असतानाच आता यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) दुखापतग्रस्त झाल्याने सूर्यकुमार यादवच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आज  (१२ फेब्रुवारी) भारत आणि नामिबिया आमनेसामने येणार आहेत. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी सराव करताना ईशान किशनला दुखापत झाली. सरावादरम्यान जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) एक वेगवान यॉर्कर थेट ईशानच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर आदळला. चेंडूचा वेग इतका होता की ईशान वेदनेने विव्हळताना दिसला. त्याला तात्काळ फिजिओंची मदत घ्यावी लागली.

Ishan Kishan Injury

सर्वात चिंतेची बाब म्हणजे, उपचारानंतर ईशानने पुन्हा सराव करण्याचा प्रयत्न केला, पण अवघ्या ५ मिनिटांतच त्याला सराव थांबवावा लागला. बीसीसीआयने (BCCI) याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार दुखापत गंभीर नसून तो ठीक आहे. तरीही, सामन्याच्या तोंडावर तो सराव सोडून गेल्याने चाहत्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

दुसरीकडे, पोटाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र, “आजच्या मॅचमध्ये तो खेळणार की नाही, याचा निर्णय ऐनवेळी होईल,” असं तिलक वर्मानं स्पष्ट केलंय. पाकिस्तानने सलग दोन विजय मिळवून ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यामुळे भारताला पुन्हा टॉपवर जाण्यासाठी नामिबियाला हरवणं गरजेचं आहे, पण ओपनर्सच्या फिटनेसमुळे टीम इंडियाचं टेन्शन मात्र नक्कीच वाढलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही