अभिषेक शर्मा हॉस्पिटलमधून घरी, पण प्लेइंग 11 मधून बाहेर? ‘हा’ स्फोटक खेळाडू घेणार जागा?

अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी नामिबियाविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published On: 

Abhishek Sharma Health Update: नामिबियाविरुद्ध खेळणार का? सस्पेन्स कायम!

वर्ल्ड कपच्या धामधुमीत टीम इंडियासाठी (Team India) एक आनंदाची आणि एक चिंतेची बातमी एकाच वेळी समोर आली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, पोटात संसर्ग झाल्याने थेट रुग्णालयात दाखल झालेला स्टार ओपनर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आता कसा आहे? तो नामिबियाविरुद्ध मैदानात उतरणार की नाही? या प्रश्नांनी चाहत्यांचा जीव टांगणीला लावला होता. आता खुद्द तिलक वर्मानं (Tilak Varma) याबाबत मोठी अपडेट दिली आहे.

दिल्लीत पोहोचताच अभिषेक शर्माची तब्येत बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुदैवाने, त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, ही भारतीय चाहत्यांसाठी मोठी ‘गुड न्यूज’ आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यानंतर त्याला पोटाचा त्रास जाणवत होता. मात्र, डिस्चार्ज मिळाला असला तरी ‘पिक्चर अजून बाकी आहे’.

Abhishek Sharma Health Update

अभिषेक १२ फेब्रुवारीला होणाऱ्या नामिबियाविरुद्धच्या सामन्यात (Ind vs Namibia) खेळणार की नाही, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. तिलक वर्मानं स्पष्ट केलंय की, “मॅचच्या वेळीच अभिषेकच्या फिटनेसची अंतिम चाचपणी होईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.” म्हणजेच, अभिषेक पूर्णपणे फिट नसल्यास टीम इंडियाला ‘प्लॅन बी’ वापरावा लागेल.

जर अभिषेक शर्मा अनफिट ठरला, तर संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. संजूने नेट्समध्ये (Nets) जोरदार सराव केल्याचंही दिसून आलंय. अभिषेकने अमेरिकेविरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट गमावली होती, त्यात आता आजारपण. त्यामुळे दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) होणाऱ्या या लढतीत रोहित शर्मा आणि कंपनी काय निर्णय घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही