श्रेयस तळपदे अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल; आता थेट अटक होणार?

यूपीच्या मैनपुरीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदेसह १२ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडालीये.

Published On: 

Shreyas Talpade FIR: श्रेयस तळपदेवर फसवणुकीचा गुन्हा!

बॉलिवूडमध्ये सध्या काय चाललंय? असा प्रश्न पडावा इतक्या वेगाने अभिनेते कायद्याच्या कचाट्यात सापडत आहेत. ९ कोटींच्या चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादवने नुकतंच तिहार तुरुंगात सरेंडर केलं. ही बातमी ताजी असतानाच आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्यावर मोठी टांगती तलवार आलीये.

‘पुष्पा’चा आवाज आणि आपल्या सहज अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) अचानक मोठ्या कायदेशीर पेचात अडकलाय. ‘FIR Against Shreyas Talpade’ ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून, उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये श्रेयस सह तब्बल १२ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडालीये. गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे.

Shreyas Talpade Fraud FIR

एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी भोगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. मिश्राना परिसरात राहणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर, कोर्टाच्या आदेशाने पोलिसांनी थेट एफआयआर दाखल करत तपासाला वेग दिलाय. यात अभिनेत्याचं नाव आल्याने हा एक मोठा गौप्यस्फोट मानला जातोय.

सागा ग्रुपचे संचालक समीर अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीने २०१५ मध्ये एलयूसीसी (LUCC) बँकेची शाखा उघडली होती. शेकडो गावकऱ्यांनी विश्वासाने यात आपले कष्टाचे पैसे गुंतवले. पण जेव्हा परताव्याची वेळ आली, तेव्हा संचालकांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. उलट, पैसे मागणाऱ्यांना चक्क खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली गेली. धक्कादायक म्हणजे, २०२४ मध्ये या बँकेने रातोरात आपला गाशा गुंडाळला.

फसवणूक झाल्याचं लक्षात येताच १४ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यानंतर दाखल झालेल्या एफआयआरमध्ये श्रेयस तळपदेसह फंड मॅनेजर संजय मुदगिल, आरके सेट्टी आणि इतर साथीदारांची नावे समोर आली आहेत. आता या प्रकरणात श्रेयसचा थेट संबंध काय? की तो केवळ यात गोवला गेलाय? याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी नाही. पण सध्या तरी राजपाल यादव पाठोपाठ श्रेयसच्या अडचणी वाढल्याचं चित्र स्पष्ट आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही