📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

रामदेव बाबांच्या कंपनीने मोडले सर्व रेकॉर्ड; ९ महिन्यातच कमावले 29 हजार कोटी!

पतंजली फूड्सने आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत २९,००० कोटींचा महसूल जमा करत ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. एफएमसीजी क्षेत्रात कंपनीची घोडदौड सुरूच आहे.

Published On: 

Patanjali Foods Result: रामदेव बाबांचा 'हा' रेकॉर्ड पाहिलात?

🕒 1 min read

बाजारात मंदीची लाट असो किंवा महागाईचा भडका, बाबा रामदेव यांची ‘पतंजली’ (Patanjali) मात्र सुसाट सुटली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, जागतिक अर्थव्यवस्थेत चढ-उतार सुरू असतानाच पतंजली फूड्सने कमाईचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांतच कंपनीने कमाईचा (Revenue) नवा उच्चांक गाठलाय. पतंजलीच्या इतिहासात पहिल्यांदाच महसूल २९,००० कोटींच्या घरात पोहोचला आहे. फक्त तिसऱ्या तिमाहीचा (Q3) विचार केला, तर हा आकडा १०,५०० कोटींच्या जवळपास आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजारात कच्च्या मालाचे भाव अस्थिर असताना आणि रुपयाची किंमत घसरत असतानाही पतंजलीने हे यश मिळवलंय, ज्यामुळे कॉर्पोरेट विश्वात खळबळ उडाली आहे.

Patanjali Foods Result

खाद्यतेल आणि एफएमसीजी (FMCG) या दोन्ही आघाड्यांवर कंपनीने जोरदार बॅटिंग केली आहे. एफएमसीजी सेगमेंटमध्ये तब्बल ३८.९३ टक्के वाढ नोंदवण्यात आली असून, या विभागाने ३२४८ कोटींची विक्री केली आहे. तर दुसरीकडे, खाद्यतेल विभागाने ७३३५ कोटींचा गल्ला जमवला आहे. ग्राहक आता सुट्या तेलापेक्षा ब्रँडेड तेलाला पसंती देत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय.

कंपनीचा एकूण EBITDA ४९२ कोटींच्या आसपास राहिला असून, कर कपातीनंतरचा नफा (PAT) ५९३ कोटींच्या घरात आहे. या तिमाही निकालांमुळे (Quarterly Results) गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या असून, आगामी काळात कंपनी काय नवीन करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!