Share

सीमेवरील शत्रू Amit Shah आणि मोदीजींमुळे बिळात लपून बसलेत – एकनाथ शिंदे

Eknath Shinde lauded the leadership of Amit Shah and PM Narendra Modi, crediting them for strengthening national security and repealing Article 370. Union Home Minister Amit Shah Pays Tribute to Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad.

Published On: 

Eknath Shinde lauded the leadership of Amit Shah and PM Narendra Modi, crediting them for strengthening national security and repealing Article 370.

रायगड – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, खासदार व आमदारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे गौरवगान करताना त्यांना अपेक्षेप्रमाणे दीर्घ आयुष्य लाभले असते, तर देशाचा इतिहासच वेगळा असता, अशी भावना व्यक्त केली. “महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं नसतं तर आपण आजही गुलामगिरीत असतो,” असंही त्यांनी सांगितलं.

शिंदे यांनी सांगितलं की, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करताना वापरलेली वाघनखे ब्रिटनमधून परत आणण्यात आली असून, त्यांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

Enemies at the border are hiding because of Amit Shah and Narendra Modi – Eknath Shinde

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश मजबूत झाल्याचा दावा केला. “सीमेवरील शत्रू बिळात बसले आहेत,” असं वक्तव्य करत त्यांनी अनुच्छेद 370 हटवण्यासारख्या निर्णयांचे कौतुक केलं. 26/11 चा मास्टरमाईंड राणा भारतात आणून फासावर लटकवण्याची प्रक्रिया ही केंद्र सरकारची कामगिरी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

अमित शाह यांनी रायगड किल्ल्याला प्रेरणास्थळ बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. “ही जागा केवळ ऐतिहासिक नसून पवित्र आहे. इथं शिवरायांचा जन्म झाला, राज्याभिषेक झाला आणि त्यांचा शेवटचा श्वासही याच भूमीत घेतला गेला,” असं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी इथं येऊन महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असा शाह यांचा संदेश होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install