बारामती | प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीनंतर काका-पुतण्याच्या नात्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
रस्त्यांच्या कामांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “रस्त्याच्या कामांबाबत काकाला विश्वासात घ्या. कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे चालत नाही.” त्यांच्या या विधानावर उपस्थित प्रेक्षकांमध्ये हास्याची लाट उसळली.
Take Kaka into Confidence : Ajit Pawar
यानंतर अजित पवारांनी मिश्किल अंदाजात स्पष्ट केलं, “मी इथे काका कुतवलांबद्दल बोलत होतो. नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल, ‘दादा घसरले, दादा कोणावर तरी घसरले!’”
या विधानामुळे एकीकडे उपस्थितांमध्ये हास्यविनोदाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी दुसरीकडे राज्याच्या राजकारणात याचे विविध अर्थ लावले जात आहेत. राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये उघड उघड झालेली फूट आणि त्यानंतरचं हे वक्तव्य, हे लक्षवेधी ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या