Sanjay Shirsat | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्रामध्ये एनडीए राहणार नाही. एनडीएचा सर्वात मोठा पराभव महाराष्ट्रामध्ये होणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
संजय राऊत यांच्या या वक्तव्याला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांना भविष्य सांगायची सवय लागली आहे. त्याचबरोबर राऊतांच्या वक्तव्याला काडीची किंमत नसते, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut has a habit of predicting the future – Sanjay Shirsat
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “संजय राऊत यांना भविष्य सांगायची सवय लागली आहे. सरकार एक महिन्यात कोसळेल, दोन महिन्यात कोसळेल असं ते आधी म्हणायचे. मात्र, तसं काही झालं नाही. म्हणून आज ते सरकारबद्दल बोलत नाही.
त्याचबरोबर संजय राऊत जे काय प्रतिक्रिया देतात त्याला कवडीची किंमत नसते. दररोज सकाळी दहा वाजता वाजायला राज्यपाल काही संजय राऊतांसारखा भोंगा नाही.
राज्यपाल हे राज्यपाल आहेत. ते एक घटनात्मक पद आहे. राज्यपालांना रोज प्रेस घेऊन तुमच्यासारखी बडबड करायची गरज नाही. राज्यपाल शांतपणे त्यांची सर्व कामं करत आहेत.”
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटातील आमदारांना ‘सडके आंबे’ म्हणतं त्यांच्यावर खोचक टीका केली होती. यावर बोलताना शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सडके आंबे म्हटलं आहे.
याचा अर्थ असा की त्यांनी आमचा सडेपर्यंत वापर करून घेतला आहे. आमच्यातली कलागुण आता त्यांना कळायला लागले आहे. आम्ही संघटना मजबूत करण्यासाठी उपयुक्त होतो हे आता त्यांना कळून चुकलं आहे.
परंतु आता आमच्यावर आरोप प्रत्यारोप करायचा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव झाला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे सतत टोमणे मारत असतात.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला जावं असं विरोधक सतत म्हणत आहेत. यावर भाष्य करत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “कुणी कुठे जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्यांना मणिपूरबद्दल अधिक सहानुभूती वाटत असेल त्यांनी त्या ठिकाणी जावं.
तुम्हाला त्या ठिकाणी जायला कुणी अडवलेलं नाही. घरात बसून इतरांवर टीका करणं सोपं आहे. मात्र, प्रत्यक्षात जाऊन काम करणं अवघड असतं.”
महत्वाच्या बातम्या
- Indurikar Maharaj | इंदुरीकर महाराजांच्या चिंतेत वाढ! वादग्रस्त वक्तव्यावरून होणार गुन्हा दाखल
- Ambadas Danve | “हे नैतिक अधिकार तुम्हाला…”; आशिष शेलारांच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर
- Omicron | नागरिकांनो काळजी घ्या! पुण्यात आढळला ओमीक्रोनचा नवा व्हेरिएंट
- Best Bus Strike | अखेर बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे
- Sanjay Raut | “… तर मी खासदारकी सोडेल”; संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य