Bacchu Kadu | झुकेगा नही साला; सरकार विरोधात बच्चू कडूंचा मोर्चा

Bacchu Kadu | अमरावती: प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. आज 09 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून बच्चू कडू आज अमरावतीमध्ये जन एल्गार मोर्चा काढणार आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चामध्ये शेतकऱ्यांसाठी तब्बल 10 मागण्या करण्यात येणार आहे.

आज अमरावतीमध्ये हा मोर्चा निघणार आहे. त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या मोर्चाचं आयोजन करण्यात येईल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Around 10 to 15 thousand farmers will participate in this march

अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर या मोर्चामध्ये तब्बल 10 ते 15 हजार शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अमरावतीमधील संत गाडगेबाबा यांच्या समाधी पासून या मोर्चाला सुरुवात होणार असल्याचं बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरामध्ये बॅनर्स झळकले आहे.

‘झुकेगा नही साला’ असं या बॅनरवर लिहिलेलं आहे. ‘नाही परवा सत्तेची कारण चिंता आहे शेतकऱ्यांची, बच्चुभाऊ शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मैदानात, असं देखील या बॅनरवर नमूद करण्यात आलं आहे. बच्चू कडू यांच्या या मोर्चानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “हा मोर्चा म्हणजे सरकारला विरोध नाही. तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही एक चळवळ आहे.

शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सकारात्मक विचार करतील, अशी आम्ही अशा व्यक्त करतो. प्रशासनानं शेतकऱ्यांच्या बहुतांश प्रश्नांकडं दुर्लक्ष केलं आहे.

यामध्ये दूध भेसळ प्रश्न, अतिवृष्टीमुळं झालेलं नुकसान इत्यादी समस्यांचा समावेश आहे. सरकारनं आमच्या मागण्या मान्य करत बळीराजाला दिलासा दिला पाहिजे.

“शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही या मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चाची सुरुवात अमरावती शहरापासून होणार आहे.

त्यानंतर प्रहार संघटना प्रत्येक जिल्ह्यात हा मोर्चा काढून आपला निषेध नोंदवणार आहे”, असही ते (Bacchu Kadu) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.