Share

Ashish Shelar | “तुम्ही छत्रपती संभाजी नगरचे असल्यामुळे…”; आशिष शेलारांची अंबादास दानवेंवर खोचक टीका

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईतील रस्त्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली होती.

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेते आशिष शेलार आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या शाब्दिक चकमक झाल्याची दिसून आली आहे.

लबाड लांडगा ढोंग करतोय, असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला धारेवर धरलं होतं. आशिष शेलार यांच्या या टीकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा आशिष शेलार यांनी अंबादास दानवेंवर निशाणा साधला आहे.

Ambadas Danve must know very little about Mumbai – Ashish Shelar

ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “मा. अंबादास दानवे जी तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे असल्याने मुंबईची थोडी कमी माहिती असू शकते म्हणून अधिकची माहिती देतो.

◆ आम्ही मुंबई महापालिकेत सत्ताधारी होतो, पण तुमच्या सारखे अहंकारी “सत्ताधीश” नव्हतो…आम्ही तेव्हा ही मुंबईकरांचे सेवक होतो आणि आजही आहोत
◆ तेव्हा पण आम्ही मुंबईकरांसाठी संघर्ष करीत होतो.. आणि आजही.
● क्रॉफर्ड मार्केट बिल्डरच्या घशात घालण्याच्या विरोधात भाजपाने त्यावेळी संघर्ष केला
●तुरटीचा घोटाळा आमच्या गोपाळभाई शेट्टी यांनी काढला
●सॅप प्रणाली घोटाळा आम्ही उघड केला

असे बरेच विषय आहेत म्हणून तुमच्या नेत्यांना आम्ही सांगतो की, एकदा खुल्या चर्चेला या. पण ते अहंकार सोडायला तयार नाहीत. उरला प्रश्न बँक ठेवींचा.

ते मुंबईकरांचे करातून जमा झालेले पैसे आहेत. मातोश्री 1 किंवा मातोश्री 2 मधून आलेले नाहीत. चांगल्या सेवा- सुविधा मिळाव्यात म्हणून मुंबईकरांनी पालिकेला दिलेले आहेत. बँकाना व्याजावर पैसे कमवण्यासाठी दिलेले नाहीत!

दरम्यान, अंबादास दानवे यांनी आशिष शेलारांवर (Ashish Shelar) टीका केली होती. ते म्हणाले, “काय तो साक्षात्कार आशिष शेलार तुमचा!

शिवसेना मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या बाकावर बसलेली असताना तुम्ही आणि तुमचा जगातील सर्वात मोठा पक्ष काय डोळे लावून ध्यान करत होतात का?

सत्तेत भागीदारी घेऊन पुन्हा हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतो आहेच! ज्या प्रकारे मुंबईकरांच्या ठेवी ‘उडवल्या’ जात आहेत त्यावरून मुंबईकरांना काही सांगायची गरज नाही.”

महत्वाच्या बातम्या

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईतील रस्त्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now