🕒 1 min read
Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: लेखक, विचारवंत आणि वक्ते हरी नरके यांचं आज मुंबई दुःखद निधन झालं आहे. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
वयाच्या साठाव्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या या निधनानंतर सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Today we lost a bright scholarly personality – Sharad Pawar
ट्विट करत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते.
त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले. हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते.
मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले.
हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी.
त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली.”
मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले.
हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय… pic.twitter.com/hlyv43Gw64
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 9, 2023
दरम्यान, हरी नरके महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विषयी समग्र लिखाण करणारे विचारवंत होते. ते पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे उपाध्यक्ष होते.
त्याचबरोबर ते पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यामध्ये हरी नरके यांचे खूप महत्त्वाचे योगदान होते.
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे-मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Sambhaji Bhide | होय! मीच यशोमती ठाकूर यांना धमकी दिली; संभाजी भिडेंच्या समर्थकाचा मोठा खुलासा
- Sanjay Raut | “… म्हणून मी नरेंद्र मोदींचे आभार मानतो…”; संजय राऊतांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
- Uddhav Thackeray | “जनतेच्या प्रश्नावर नेहमीप्रमाणे मौनीबाबा…”; ठाकरे गटाची मोदी सरकारवर टीका
- Bacchu Kadu | झुकेगा नही साला; सरकार विरोधात बच्चू कडूंचा मोर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










