Share

Devendra Fadnavis | “… म्हणून काही लोक रोज पत्र लिहितात”; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis | मुंबई: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईच्या विकास कामावरून राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला होता. देशामध्ये मुंबईकर सर्वात जास्त कर देतो. मात्र, तरीही मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळत नाही. त्याचबरोबर कर भरून देखील मुंबईकरांना टोल भरावा लागतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरे यांनी याबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना पत्र … Read more

Published On: 

Devendra Fadnavis | मुंबई: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईच्या विकास कामावरून राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला होता.

देशामध्ये मुंबईकर सर्वात जास्त कर देतो. मात्र, तरीही मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळत नाही. त्याचबरोबर कर भरून देखील मुंबईकरांना टोल भरावा लागतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

आदित्य ठाकरे यांनी याबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना पत्र देखील लिहिलं होतं. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

Mumbai will soon be pothole free – Devendra Fadnavis 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मुंबईमध्ये अनेक विकास काम सुरू आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे.

त्यामुळं चांगली काम सुरू असताना काही लोकांच्या पोटात दुखतं. म्हणून ते एक रोज पत्र लिहितात. अशाच प्रकारचं एक पत्र त्यांनी 25 वर्षांपूर्वी स्वतःला लिहिलं असतं तर कदाचित मुंबईची अवस्था अधिक चांगली असते.

मी चहल यांना एवढेचं सांगू इच्छितो की, तुम्ही चांगलं काम करत आहात. मात्र, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या शेजारी ती लोकं बसलेली आहे. त्यामुळं तुमच्यावर रोज टीका होईल.

परंतु तुम्ही त्यांना तुमच्यावर बोट उचलण्याची संधी देऊ नका. तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम करत राहा. मुंबईमध्ये विकास काम सुरू आहे. या वेगाने जर ही काम सुरू राहिली तर लवकरच मुंबई खड्डे मुक्त होईल.”

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहत काही मागण्या केल्या होत्या. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली होती. ट्विट करत ते म्हणाले, “घटनाबाह्य खोके सरकारने मुंबईकरांना लुटण्याचा सपाटाच लावलाय!

आता तर मुंबई महानगरपालिकेवर पूर्व आणि पश्चिम महामार्गांच्या देखभालीची जबाबदारी टाकल्यावरही टोल मात्र MSRDC मार्फत घेतला जातोय, शिवाय मुंबईचा स्ट्रीट टॅक्स आहेच.

हा दुहेरी टॅक्स मुंबईकरांनी का भरावा? त्यातच मुंबईच्या महामार्गांवरच्या होर्डिंग्सचा महसुल मात्र मुंबई महानगरपालिकेला मिळत नाहीये. मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहे.

आम्ही सत्तेत आल्यावर मुंबईकरांची ह्या अन्यायकारक टोलपासून सुटका करणारच! पण आत्ताच्या सरकारकडून मुंबईकरांना लुटण्याचा जो खेळ चाललाय त्याचा पर्दाफाश केला.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही