Rahul Gandhi | नवी दिल्ली: मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार होताना दिसत आहे. या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधारी पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे.
या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारला चागलं सुनावलं आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या केली असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
BJP government has killed Manipur – Rahul Gandhi
राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, “भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामुळे मणिपूर उध्वस्त होताना दिसत आहे. भारत आपला आणि आपल्या जनतेचा आवाज आहे आणि त्या आवाजाची भाजप सरकारने मणिपूरमध्ये हत्या केली आहे.
मणिपूरमध्ये भाजपने भारत मातेची हत्या केली आहे. मणिपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून गेले नाही. त्यामुळे तुम्ही देशभक्त नाही तर देशद्रोही आहात.”
पुढे बोलताना ते (Rahul Gandhi) म्हणाले, “भारतीय सेना एका दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करू शकते. मात्र, मोदी सरकार तसं करायला तयार नाही. मोदींनी मणिपुरात हिंदुस्तानची हत्या केली आहे.
म्हणूनच कदाचित मोदी अद्याप त्या ठिकाणी गेलेले नाही. मणिपूरमध्ये जोपर्यंत शांतता प्रस्थापित होणार नाही, तोपर्यंत तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात, मी असंच समजणार आहे.”
“रावणाप्रमाणे नरेंद्र मोदी देखील दोन जणांचं ऐकतात. रावण मेघनाथ आणि कुंभकर्ण यांचं ऐकायचा आणि नरेंद्र मोदी अमित शाह आणि अदानी यांचं ऐकतात.
पंतप्रधान देशातील जनतेचा आवाज ऐकू शकत नाही. मग ते कुणाचा आवाज ऐकतात?” असंही ते (Rahul Gandhi) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | शरद पवारांना आणखी एक मोठा झटका! बड्या नेत्याचा राष्ट्रवादीला रामराम
- Narendra Modi | शरद पवारांना काँग्रेसमुळे पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही – नरेंद्र मोदी
- Devendra Fadnavis | “… म्हणून काही लोक रोज पत्र लिहितात”; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला
- Sharad Pawar | “आपण आज ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व…”; हरी नरकेंच्या निधनानंतर शरद पवारांची भावून पोस्ट
- Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे-मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण