Share

Sharad Pawar | शरद पवारांना आणखी एक मोठा झटका! बड्या नेत्याचा राष्ट्रवादीला रामराम

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. यानंतर बहुतांश आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे. या घटनेनंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. अशात शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे … Read more

Published On: 

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे.

यानंतर बहुतांश आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे. या घटनेनंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. अशात शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपप्रदेश अध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. अनिल गोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Anil Gote resigned due to factionalism within the party

अनिल गोटे यांनी पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे. हा राजीनामा दिल्यानंतर गोटे कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचं बोललं जात आहे.

मात्र, अनिल गोटे यांनी पक्ष सोडल्यामुळं शरद पवार (Sharad Pawar) यांच्या चिंतेत भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

अनिल गोटे म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत गटबाजी सुरू आहे. या सर्व गोष्टींमुळे आमची घुसमट होत होती. पक्षश्रेष्ठींच्या जाहीर कार्यक्रमात देखील पक्षांतर्गत गटबाजी सुरू होती. म्हणूनच पक्षातील गटबाजीला कंटाळून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत आहे.”

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर अनिल गोटे यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडं आपला राजीनामा दिला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांविषयी (Sharad Pawar) मोठं वक्तव्य केलं आहे. “काँग्रेसमध्ये घराणेशाहीचं राजकारण सुरू आहे. त्यांच्या या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही.

राजकीय क्षमता असून देखील घराणेशाहीमुळं काँग्रेसनं अनेक नेत्यांना डावरलं आहे”, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असल्याचं सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ ला सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही