Anil Deshmukh | एल्गार मोर्चा बच्चू कडूंचं दबावतंत्र असू शकतं – अनिल देशमुख

Anil Deshmukh | नागपूर: प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज अमरावतीमध्ये जन एल्गार मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

अमरावतीनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडूंचा (Bacchu Kadu) हा मोर्चा दबावतंत्र असू शकतो, असं विधान अनिल देशमुख यांनी केलं आहे.

Out of 105 BJP MLAs, 100 MLAs are restless – Anil Deshmukh

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले, “मी आधीही सांगितलं होतं की राज्य सरकारमधील अनेक आमदार अतिशय अस्वस्थ आहेत.

भाजपच्या 105 आमदारांपैकी 100 आमदार अस्वस्थ आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार देखील अस्वस्थ आहे.

आमची खाजगी भेट झाल्यावर ते आमदार आम्हाला याबद्दल सांगतात. बच्चू कडू यांना कळून चुकलं की त्यांना आता मंत्रिपद मिळणार नाही. त्यामुळं त्यांचा हा एल्गार मोर्चा दबावतंत्र असू शकतं.”

पुढे बोलताना ते (Anil Deshmukh) म्हणाले, “शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन वर्षभरापूर्वी देण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी आपलं आश्वासन पाळलं नाही. म्हणून शिंदे गटातील आमदारांची गोची झाली आहे.

विधानसभा किंवा इतर ठिकाणी भेटल्यावर ते आमदार त्यांची अस्वस्थता आमच्याकडं बोलून दाखवतात.” अनिल देशमुख यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “हा मोर्चा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक चळवळ आहे.

हा मोर्चा सरकारला विरोध करण्यासाठी नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर सकारात्मक विचार करतील, अशी आम्ही अशा व्यक्त करतो.

या मोर्चाची सुरुवात अमरावती शहरापासून होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काढला जाणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.