Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटाने भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
देशात लोकशाही, व्यक्तिगत स्वातंत्र्य, खाण्यापिण्याचे, कपडालत्ता वापरण्याचे, धार्मिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य धोक्यात असल्याचं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाहांचं (Amit Shah) सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा अमानुष गैरवापर करत असल्याचं देखील आजच्या सामना अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
Read Samana Editorial
हिंदुस्थान हा आर्थिक महासत्ता झालेला शेजारच्या चीनसारख्या राष्ट्रांना बघवत नाही. हिंदुस्थानचा चीनशी थेट आर्थिक संघर्ष आहे. देशाची आर्थिक प्रगती त्यांना बघवत नाही. त्यामुळे हिंदुस्थानात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला जातो.
हिंदुस्थानातच उभे राहून हिंदुस्थानात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला जातोय, हीच लोकशाही देशात जिवंत असल्याची निशाणी असल्याचे साळवे म्हणतात. साळवे जे म्हणत आहेत ते मान्यच केले पाहिजे.
सध्याचे सरकार राजकीय विरोधकांना आज फक्त धमक्या देतेय, चौकश्यांचा ससेमिरा लावून बेजार करतेय. अद्यापि त्यांना विनाचौकशी फासावर लटकवले जात नाही हे आपल्या देशात लोकशाही जिवंत असल्याचेच लक्षण आहे. कायदेपंडित साळवे यांनी सत्य समोर आणले, त्याबद्दल त्यांचे आभार!
हरीश साळवे यांचे कायद्याचे ज्ञान व अनुभव निर्विवाद आहे. इंग्लंडच्या राजघराण्याचे ते वकील आहेत व त्यांचा बराचसा वेळ हा युरोप वगैरे देशांत कोर्टकज्जे चालविण्यात जातो. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे वकील आहेत.
आपल्या देशातील सर्वात महागडे वकील म्हणूनही त्यांचा लौकिक आहे, पण पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांचा खटला त्यांनी फक्त एक रुपयाच्या मोबदल्यात चालविला सीमाप्रश्री मराठी बांधवांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची जी गळचेपी सुरू आहे त्या प्रकरणात साळवे हेच महाराष्ट्राची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहेत त्यांचे ‘घराणे’ हे लोकशाही परंपरेचा मान राखणारे आहे.
कायदेपंडित साळवे यांनी आता आरोप केला आहे की, हिंदुस्थानात लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा मृत्यू झाला असल्याचा भ्रम हा आपल्याच देशातून पसरवला जात आहे.
देशाची प्रगती रोखण्यासाठी हे सर्व घडवले जात आहे, असे कायदेपंडित साळवे यांचे म्हणणे आहे. साळवे हे ‘साम्राज्यांचे वकील आहेत. आपल्या देशातील अनेक कॉर्पोरेट्स, बडया उद्योगपतींचे ते कायदेशीर सल्लागार आहेत श्री हरीश साळवे यांनी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात एक विधान केले.
ते नेमके वेगळे व या विधानाच्या विरुद्ध टोकाचे होते. ‘अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ‘ईडी’ला मनी लॉण्डरिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे पाशवी अधिकार देण्यात आले आहेत.
त्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्य धोक्यात येऊ नये म्हणून त्याला लगाम घालायलाच हवा श्री साळवे यांचे हे मत आपल्या देशात सुरू असलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात आहे. साळवे यांनी त्यांचा मुद्दा अधिक स्पष्ट करून सांगितले की, ‘ईडी’ला दिलेले अधिकार कठोर आहेत.
लॉर्डशिप्सने त्यांच्यावर लगाम लावला नाही, तर या देशात कोणीही सुरक्षित नाही साळवे यांच्या विधानाचा सरळ अर्थ असा की, केंद्र सरकार ‘ईडी’च्या माध्यमातून व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपीच करत आहे. तरीही हरीश साळवे आता सांगतात, वैयक्तिक स्वातंत्र्य धोक्यात वगैरे काहीच नाही उगाच देशाची बदनामी करू नका!
खरे तर आज आपण सगळेच भयानक परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहोत. देशात लोकशाही, व्यक्तिगत स्वातंत्र्य, खाण्यापिण्याचे, कपडालत्ता वापरण्याचे, धार्मिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य धोक्यात आहे.
मोदी शहांच्या सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा अमानुष गैरवापर चालवला आहे व अशा अमानुष गैरवापराचे बळी ठरलेल्या काही उद्योगपतींचे खटले स्वत साळवे चालवीत आहेत.
सत्तेचा गैरवापर करून मोदी-शहांच्या सरकारने नऊ सरकारे पाडली. महाराष्ट्रात शिवसेना हुकूमशाही पद्धतीने पडून भाजपने एक अनैसर्गिक सरकार निर्माण केले. यातल्या फुटीर शिवसेना गटाचे वकील म्हणूनही श्री. साळवे काम पाहतात.
अर्थात हा त्यांचा व्यवसायाचा भाग झाला, पण बहुमतातले सरकार अशा पद्धतीने ईडीचा वगैरे धाक दाखवून पाडणे हे लोकशाही व स्वातंत्र्याच्या कोणत्या कायदेशीर व्याख्येत बसते?
इंग्लंडमध्येही हे सर्व चालत नाही. खोटेपणा सिद्ध झाल्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता ‘पार्टगिट’ प्रकरण त्यांच्यावर शेकल्याने त्यांना पदत्याग करावा लागला.
कोविड महामारीच्या काळात डाऊनिंग स्ट्रीटवर त्यांनी लॉक डाऊन नियमांचे उल्लंघन करून एक ‘पार्टी’ केली व त्याबाबत हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे ब्रिटिश संसदेची दिशाभूल केली.
श्री. साळवे हे इंग्लंडनिवासी असल्यामुळे हे सर्व त्यांना माहीत असणारच, पण आपल्या देशात राज्यकर्ते रोज शपथेवर खोटे बोलतात, संसदेलाही भ्रमित करतात व पुन्हा देशभक्तीचा आव आणतात. राहुल गांधी मानहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात हायकोर्टावर केलेले भाष्य साळवे यांच्या डोळयांखालून गेलेच असेल.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द व्हावी याच एकमेव उद्देशाने संपूर्ण खटला चालवून त्यासाठीच न्यायदान झाले. ही एका संसद सदस्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची गळचेपी नाही तर काय?
संसदेत सत्ताधारी पक्षाचे सभागृह नेते हे बेफामपणे विरोधकांना ‘देशद्रोही’ म्हणतात व त्याविरोधात आवाज उठवणारया खासदारांना संसदेतून बडतर्फ केले जाते मणिपूरच्या हिंसाचारावर नियम 267 नुसार चर्चा व्हावी व पंतप्रधान महोदयांनी त्यावर निवेदन करावे, अशी मागणी करणारया संजय सिंह, डेरेक ओब्रायन या राज्यसभा सदस्यांवर कठोर कारवाई केली.
दिल्लीतील लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्यांचे अधिकार काढून घेतले व त्यांना पंगू केले. मणिपुरात हिंदुस्थानी नागरिक असलेल्या महिलांची नग्न धिंड काढूनही तेथील भाजप मुख्यमंत्र्यांना संपूर्ण अभय आहे. ही मनमानी आहे.
देशात मोकळा श्वास घेणे कठीण झाले आहे. भयाच्या अदृश्य पोलादी भिंतीत गुदमरल्याची भावना सर्वत्र आहे. जम्मू-कश्मीरमध्ये चार वर्षांपासून निवडणुका नाहीत. मुंबईसह चौदा महानगरपालिकांवर प्रशासक नेगून कारभार चालवणे हा भ्रष्टाचार व लोकशाहीची हत्या आहे.
सर्व भ्रष्टाचारयांवर आधी ‘ईडी’ लावायची व मग त्यांना पक्षात घेऊन मंत्री करायचे हा स्वातंत्र्याचा अपमान आहे; पण हा स्वैराचार म्हणजे लोकशाहीची हत्या नव्हे, असे इंग्लंड वगैरे ठिकाणी बसलेल्या आपल्या विद्वानांना वाटणे हे या महान देशाचे दुर्दैव आहे. हरीश साळवे हे एक प्रतिष्ठत कायदेपंडित आहेत
. त्यांना त्यांची मते मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे, पण त्यांची मते व देशातील सद्यस्थिती यात मोठे अंतर आहे. आपण आपली लोकशाही, संसदीय परंपरा हे इंग्लंडकडून घेतल्याचे म्हटले जाते.
इंग्लंडमध्ये लोकशाही, वैयक्तिक स्वातंत्र्य शाबूत आहे, तेथे सर्व धर्मांत समन्वय आहे म्हणून ऋषी सुनक पंतप्रधान होऊ शकले. आपल्या देशात धर्म, धर्मांधता, जातीयवादास खतपाणी घालून राजकारण केले जाते है ठीक, पण आता राजकीय स्वार्थासाठी धर्माधर्मात भांडणे लावून दंगलीचे वणवे पेटवले जातात.
लोकशाहीवरचे है आक्रमण धोकादायक आहे. हिंदुस्थान हा आर्थिक महासत्ता झालेला शेजारच्या चीनसारख्या राष्ट्रांना बघवत नाही. हिंदुस्थानचा चीनशी थेट आर्थिक संघर्ष आहे.
देशाची आर्थिक प्रगती त्यांना बघवत नाही. त्यामुळे हिंदुस्थानात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला जातो. हिंदुस्थानातच उभे राहून हिंदुस्थानात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला जातोय, हीच लोकशाही देशात जिवंत असल्याची निशाणी असल्याचे साळवे म्हणतात.
साळवे जे म्हणत आहेत ते मान्यच केले पाहिजे. सध्याचे सरकार राजकीय विरोधकांना आज फक्त धमक्या देतेय, चौकश्यांचा ससेमिरा लावून बेजार करतेय.
अद्यापि त्यांना विनाचौकशी फासावर लटकवले जात नाही हे आपल्या देशात लोकशाही जिवंत असल्याचेच लक्षण आहे. कायदेपंडित साळवे यांनी सत्य समोर आणले, त्याबद्दल त्यांचे आभार!
सौजन्य-सामना
महत्वाच्या बातम्या
- Ambadas Danve | “…तर ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हलू दिली नसती”; अंबादास दानवेंचं खळबळजनक विधान
- Anil Deshmukh | एल्गार मोर्चा बच्चू कडूंचं दबावतंत्र असू शकतं – अनिल देशमुख
- Ambadas Danve | सध्याचं सरकार जुलमी पद्धतीनं शासन चालवतयं – अंबादास दानवे
- Chitra Wagh | थोडी तरी लाज बाळगा; चित्रा वाघांचा राहुल गांधींवर घणाघात
- Rahul Gandhi | “मोदींनी मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या…”; राहुल गांधीजी मोदी सरकारवर बोचरी टीका