Prakash Ambedkar | येत्या दीड महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | छत्रपती संभाजीनगर: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी तयार केली आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एनडीए आणि इंडियाच्या बैठका देखील होत आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Our alliance is with Shivsena Uddhav Thackeray group – Prakash Ambedkar 

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “आमची युती  शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत आहे. निवडणुकांमध्ये काय करायचं हे मी आणि शिवसेना ठरवणार आहोत.

महाविकास आघाडीमध्ये काय घडतं? हे ते त्यांचं बघून घेतील. त्यामध्ये आम्ही डोकं घालत नाही. त्याचबरोबर त्यामध्ये लक्ष घालून आम्ही आमचं ब्लड प्रेशर का वाढवून घ्यायचं?

आमचा जो काही निर्णय होणार आहे, तो शिवसेनेबरोबरच होईल. त्यामुळं महाविकास आघाडी कोण आहे, हे आम्हाला बघायची गरज नाही.”

पुढे बोलताना ते (Prakash Ambedkar) म्हणाले, “येत्या दीड महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. दीड महिन्यात निवडणुका कशा होतील? हे मला त्यावेळी विचारा.

तेव्हा मी तुम्हाला सविस्तर उत्तर देईल. आम्ही लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आमचा लढा हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असेल. आम्ही आमचे उमेदवार उभे करण्याच्या पूर्ण तयारीत आहोत.”

यावेळी बोलत असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अदानीसाठी मणिपूर हिंसाचार सुरू आहे. सध्या आदिवासींचा खनिजावर ताबा आहे.

मैतेई समाजाने आरक्षण मागितलेलं नसताना त्यांना आदिवासी का घोषित केलं गेले? त्या ठिकाणी जर काही करायचं असेल तर आदिवासींची परवानगी घ्यावी लागते. म्हणून कदाचित या समाजाला आरक्षण दिलं आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.