Sushma Andhare | मुंबई: काल लोकसभेमध्ये भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) महिला खासदारांना फ्लाईंग किस दिली असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं होतं.
या घटनेनंतर भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडं राहुल गांधींच्या विरोधक तक्रार दाखल केली होती. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी स्मृती इराणी यांच्यावर खोचक टीका केली आहे.
Smriti Irani is a great actress – Sushma Andhare
सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, “स्मृती इराणी या एक उत्तम अभिनेत्री आहे. अभिनेत्री असायला काही हरकत नाही. मात्र त्यांनी संसद आणि राजकारणात अभिनय करू नये. संसदेमध्ये त्यांनी आपल्या खात्याशी निगडित विषयावर बोलावं.
मुळात खूप दिवसानंतर एखादा माणूस एखाद्या वास्तूमध्ये आला, तर त्याला त्याबद्दल आपुलकी वाटणं स्वाभाविक आहे. परंतु, स्मृती इराणी यांनी त्याचा अर्थ अतिशय गलिच्छ घेतला आहे. त्यामुळं आम्हाला स्मृती इराणी यांच्या बुद्धीची कीव करावी वाटत आहे.
फ्लाईंग किस हा प्रकार काल घडलेलाच नाही. स्मृती इराणी या मुद्द्यावर ज्या प्रकारे आक्रमक होत आहे, त्या प्रकारे त्यांनी मणिपूर मुद्द्यावर आक्रमक होण्याची गरज होती.”
पुढे बोलताना त्या (Sushma Andhare) म्हणाल्या, “प्रियंका चतुर्वेदी, सुप्रिया सुळे किंवा इतर महिलांबद्दल गलिच्छ बोललं जातं, तेव्हा स्मृती इराणी कुठे होत्या? स्मृती इराणी नेहमी आपल्या सोयीचं राजकारण करतात.
त्यांना त्यांच्या सोयीनुसार राजकारणाच्या गोष्टी आठवतात. ज्यावेळी त्यांचं सरकार नव्हतं, त्यावेळी त्या महिला अत्याचार, महागाई इत्यादी गोष्टींवर भाष्य करायच्या.”
यावेळी बोलत असताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मणिपूर मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, “मणिपूर मुद्द्यावर सरकार अपयशी ठरलं आहे. मणिपूर आपल्या भारताचा भाग आहे, असं स्मृती इराणी म्हणत होत्या.
परंतु त्यांना 75 दिवसानंतर या गोष्टीची जाणीव झाली आहे. केंद्र सरकारला देशातील दंगली थांबवता येत नाही. देशात ज्या ठिकाणी दंगली सुरू आहे. त्या ठिकाणी भाजपा जाणीवपूर्वक रॉकेल ओतण्याचा प्रयत्न करत आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी भारतीय जनता पक्ष वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Sambhaji Bhide | संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली तक्रार
- Chitra Wagh | “देशाला वाचवायचं असेल तर राहुल गांधींचं लग्न…”; चित्रा वाघांचा राहुल गांधींवर घणाघात
- Ambadas Danve | “आधी किरीट सोमय्यांची चौकशी करा आणि मग राहुल गांधी…”; अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका
- Vijay Wadettiwar | “ट्रीपल इंजिन सरकारमधील आमदारांना सत्तेची गुर्मी…”; पत्रकार मारहाण प्रकरणावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
- Rohit Pawar | “हे आपल्या संस्कृतीला न शोभणारे…”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया