Jitendra Awhad | ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कळवा येथील रुग्णालयात पाच रुग्णांचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली आहे.
त्यानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जुना जितेंद्र आव्हाड असता तर डॉक्टरांची कानशील लाल केली असती, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
या सर्व प्रकरणाची जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ट्विट जितेंद्र आव्हाड म्हणाले, “गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील शिवाजी रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या.
आज एका महिलेचा फोन आला की,तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत, परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये. काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता, रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो,तळपायाची आग मस्तकात गेली.
त्या महिलेचा पती हा जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत होता.तेथे पोहचलो असता, संबंधित रुग्णाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले.
तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर 5 तास उपचार करत होते. थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती.
उलट 5 तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते. याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता,त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली.
मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते.तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात.
या गंभीर रुग्णांना,दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो.आज दिवसभरात या रुग्णालयात 5 रुग्ण दगावले आहे.
गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील शिवाजी रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या.आज एका महिलेचा फोन आला की,तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत,परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये.काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता,रुग्णालयात सुरू असणारे… pic.twitter.com/ty1CBYYC6s
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 10, 2023
The hospital is literally cheating and looting the poor – Jitendra Awhad
या रुग्णालयात अक्षरशः गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू आहे. बिल वाढवून लावली जात आहेत,डॉक्टर वेळेवर कामाला येत नाहीत…इतकंच काय तर मेलेल्या रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्याचं दाखवून ही मंडळी पैसे कमवत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू आहे.यात काही कारवाई होईल ही आशा नाहीच..पण गोर गरिबांच्या सोबत हा जितेंद्र आव्हाड स्वतः उभा राहील हा शब्द मी देतो.”
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari | “… म्हणून त्याला कुणी फ्लाईंग किस म्हणू नये”; अमोल मिटकरींचं मोठं विधान
- Sushma Andhare | “स्मृती इराणी यांच्या बुद्धीची आम्हाला कीव…”; सुषमा अंधारेंची फ्लाईंग किस प्रकरणावर प्रतिक्रिया
- Sambhaji Bhide | संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली तक्रार
- Chitra Wagh | “देशाला वाचवायचं असेल तर राहुल गांधींचं लग्न…”; चित्रा वाघांचा राहुल गांधींवर घणाघात
- Ambadas Danve | “आधी किरीट सोमय्यांची चौकशी करा आणि मग राहुल गांधी…”; अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका