Rahul Gandhi | “तरुणींची कमी नसताना राहुल गांधी 50 वर्षाच्या वृध्देला फ्लाईंग किस…”; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

Rahul Gandhi | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला होता.

राहुल गांधींनी लोकसभेच्या आवारात महिला खासदारांना फ्लाईंग किस दिली असल्यास स्मृती इराणी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भाजपच्या काही महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडं राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

या घटनेनंतर राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून देशभरात आंदोलन करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर बिहार मधील काँग्रेसच्या आमदार नीतू सिंग (Neetu Singh) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Why will Rahul Gandhi give a flying kiss to a 50-year-old women? – Neetu Singh

राहुल गांधी (Rahul Gandhi) फ्लाईंग किस प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देत असताना नीतू सिंग म्हणाल्या, “राहुल गांधी यांच्याकडं तरुणींची कमी नाही. त्यामुळं त्यांना फ्लाईंग किस द्यायचा असेल तर ते तरुणींना देतील.

राहुल गांधी 50 वर्षाच्या वृध्देला फ्लाईंग किस का देतील? राहुल गांधी यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत.” नीतू सिंग यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या मुद्द्यावर बोलत असताना अमोल मिटकरी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची बाजू मांडली आहे.

ते म्हणाले, “राहुल गांधी यांच्या हातामधील काही कागदपत्र पडली होती. त्यामुळं ते उचलण्यासाठी राहुल गांधी यांनी बोटानं इशारा दिला. या घटनेला कुणी फ्लाईंग किस वगैरे म्हणू नये. फक्त बोट दाखवायला जर कोणी फ्लाईंग किस म्हणत असेल तर त्याला काही अर्थ नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.