Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: काल (10 ऑगस्ट) लोकसभेमध्ये अनेक मुद्द्यांवरून गदारोळ निर्माण झाला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारला चांगलं धारेवर धरलं होतं.
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. आमचे शेतकरी रस्त्यावर टोमॅटो फेकत होते, तेव्हा त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे सरकार आलं नव्हतं, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे.
ट्विट करत अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, “पराभव आधी रणात नाही, मनात होतो! काल सभागृहात गृहमंत्री मा. अमित शाह 2.15 तास बोलले.
अर्थमंरी मा. निर्मला सीतारामन 1.30 तास बोलल्या, सत्ताधारी पक्षातील इतर अनेक नेत्यांना बोलण्यासाठी मिळालेले ‘तासंतास’ वेगळेच! पण विरोधकांना मात्र तुलनेत अतिशय नगण्य वेळ मिळाला, हे साऱ्या देशाने पाहिलं! हातच्या कंकणाला आरसा कशाला?
The government is suppressing the voice of the opposition – Amol Kolhe
सरकार उघड उघड विरोधकांचा आवाज दाबत आहे. कारण सरकारला केवळ स्तुती ऐकण्याची सवय आणि इच्छा आहे. स्वतःच्या ‘कामगिरी’ बद्दल काहीही ऐकून घ्यायचं नाही, कोणताही आरसा पहायचा नाही!
शेतकरी, महिला, मध्यमवर्गीय यांची ‘जन की बात’ ऐकण्यापेक्षा फक्त ‘मन की बात’ करण्यात सरकारला स्वारस्य आहे. अशा प्रकारे विरोधकांचा आवाज दाबण्याची सत्ताधारी पक्षाची नीती त्यांच्या मनात निर्माण झालेली भीती स्पष्ट करतेय. लोकशाहीचा विजय असो!”
पराभव आधी रणात नाही, मनात होतो!
काल सभागृहात गृहमंत्री मा. अमित शाह २.१५ तास बोलले, अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन १.३० तास बोलल्या, सत्ताधारी पक्षातील इतर अनेक नेत्यांना बोलण्यासाठी मिळालेले 'तासंतास' वेगळेच! पण विरोधकांना मात्र तुलनेत अतिशय नगण्य वेळ मिळाला, हे साऱ्या देशाने… pic.twitter.com/wib4nB5SvU
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 11, 2023
दरम्यान, लोकसभेमध्ये गदारोळ सुरू असताना भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
लोकसभा सभागृहात राहुल गांधी यांनी महिला खासदारांना फ्लाईंग किस दिला असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. स्मृती इराणी यांच्या या आरोपानंतर सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडणार? ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधान
- Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार दिसणार एकाच मंचावर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Sanjay Raut | “शिंदेंचे आमदार मारामारी करतील म्हणून…”; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका
- Rahul Gandhi | “तरुणींची कमी नसताना राहुल गांधी 50 वर्षाच्या वृध्देला फ्लाईंग किस…”; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य
- Bacchu Kadu | सचिन तेंडुलकरच्या विरोधात बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, “थेट घरासमोर आंदोलन…”