Share

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडणार? ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधान

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या महाबळेश्वर जवळील दरे गावाकडं दोन दिवस मुक्कामासाठी निघाले होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर खराब झाल्यामुळं त्यांना पुन्हा राजभवन हेलिपॅडवर तातडीनं उतरवण्यात आलं. त्यानंतर ते दुसऱ्या हेलिकॉप्टरने दरे गावाकडे रवाना झाले. त्यानंतर महाबळेश्वर परिसरामध्ये हवामान खराब असल्यामुळं त्यांना पुन्हा एकदा साताऱ्यातील सैनिक … Read more

Published On: 

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या महाबळेश्वर जवळील दरे गावाकडं दोन दिवस मुक्कामासाठी निघाले होते.

मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर खराब झाल्यामुळं त्यांना पुन्हा राजभवन हेलिपॅडवर तातडीनं उतरवण्यात आलं. त्यानंतर ते दुसऱ्या हेलिकॉप्टरने दरे गावाकडे रवाना झाले.

त्यानंतर महाबळेश्वर परिसरामध्ये हवामान खराब असल्यामुळं त्यांना पुन्हा एकदा साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर उतरावं लागलं.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकेकाळी चांगले मित्र होतो, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

There are definitely political differences with Eknath Shinde – Jitendra Awhad

हवामान खराब असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरनं प्रवास केला. या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंबद्दल काळजी व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विट नंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मा. मुख्यमंत्री साहेब आपल्यामध्ये राजकीय मतभेद जरूर आहेत. मी हे विसरू शकत नाही की, आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध होते.

काल आपण हट्टाने हॅलिकॉप्टरचा पायलट नाही म्हणतं असताना, त्याला हवामान खराब असल्याचे सांगितले जात असतांना देखिल बळजबरीने त्याला हॅलिकॉप्टरने गावी जाण्यासाठी उड्डाण घेण्यास सांगितले. आपण हॅलिकॉप्टर साताऱ्याला उतरवलत नंतर आपण कुठे गेलात हे मला माहीत नाही.

पण हवामान खराब असतांना कधिही हॅलिकॉप्टर उडवू नये हे जागतिक अलिखित संकेत आहेत. आपण हे का केलेत ते मला माहित नाही. पण, हे असं करणं महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आपल्या वैयक्तिक दृष्टीने चुकीचे आहे. “सर सलामत तो पगडी पचास” अशी एक म्हण प्रचलित आहे.

आपण अशी भूमिका घेणे किंवा असा हट्ट धरणे हे मला वैयक्तिकरित्या पटलेले नाही. कारण कोणी काहिही म्हणो आपण एकेकाळचे चांगले मित्र होतो. ह्या नात्यानेच मी हे लिहीत आहे. असे पुन्हा कधिही करू नका.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही