Share

Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार दिसणार एकाच मंचावर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप विरोधात अधिकच आक्रमक झाला आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार रविवारी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी एकाच मंचावर दिसणार आहेत. या कार्यक्रमांकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या कार्यक्रमादरम्यान शरद पवार आणि देवेंद्र … Read more

Published On: 

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप विरोधात अधिकच आक्रमक झाला आहे.

अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार रविवारी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी एकाच मंचावर दिसणार आहेत.

या कार्यक्रमांकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या कार्यक्रमादरम्यान शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा होईल? असा प्रश्न देखील राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.

In Pune, Narendra Modi and Sharad Pawar were seen on the same platform

रविवारी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमानिमित्त देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार (Sharad Pawar) एकाच मंचावर दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यास एकत्रित हजेरी लावल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि शरद पवार यांच्यासह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीस आणि शरद पवार एका मंचावर येणार आहे.

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी भूमिका महाविकास आघाडीतील नेत्यांनी घेतली होती.

तरी देखील शरद पवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची दिल्लीत बैठक बोलावली होती. आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नसल्याचं शरद पवार यांनी या बैठकीत म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही