Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील एनडीए खासदारांसोबत बैठक देखील पार पडली.
अशात भाजपकडून शिंदे गटाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणूक शिंदे गटानं कमळ चिन्हावर लढवावी, असा आग्रह भाजपनं धरला असल्याचं बोललं जात आहे. या माहितीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
The Shinde group should contest the Loksabha elections on the lotus symbol
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या बैठका देखील आयोजित करत आहे.
भाजपनं पक्ष पातळीवर देखील निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशात भाजप मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला मोठा झटका देणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
शिवसेना शिंदे गटानं (Eknath Shinde) आगामी लोकसभा निवडणूक कमळ चिन्हवर लढवावी, अशा चर्चा संसदेच्या अधिवेशन काळात सुरू होत्या.
भाजपच्या या भूमिकेनंतर शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची गोची झाली असल्याचं बोललं जात आहे. कारण शिंदे गटाला भाजपच्या या प्रस्तावाला होकार देखील देता येत नाही आणि विरोधी करता येत नाही. इकडे आड तिकडे विहीर, अशी शिंदे गटातील आमदारांची अवस्था झाली आहे.
दरम्यान, आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे.
ते म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी काल त्यांच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. मात्र, अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
कारण एकनाथ शिंदे यांना माहीत होतं की, जेवणामध्ये त्यांचे आमदार मारामाऱ्या करतील. काल मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर उडू शकलं नाही. यावरून हे लक्षात येत आहे की त्यांच्या बाजूनं निसर्ग आणि जनता दोन्हीही नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Amol Kolhe | पराभव आधी रणात नाही, मनात होतो; अमोल कोल्हेंचं मोदी सरकारवर टीकास्त्र
- Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडणार? ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधान
- Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार दिसणार एकाच मंचावर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Sanjay Raut | “शिंदेंचे आमदार मारामारी करतील म्हणून…”; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका
- Rahul Gandhi | “तरुणींची कमी नसताना राहुल गांधी 50 वर्षाच्या वृध्देला फ्लाईंग किस…”; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य