Rahul Gandhi | “मणिपूर जळत असताना पीएम मोदी हसत…”; राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर घणाघात

Rahul Gandhi | नवी दिल्ली: मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचार घडत आहे. याचे पडसाद लोकसभा सभागृहात देखील दिसून आले आहे. मणिपूर मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं घेरलं आहे.

या संदर्भात विरोधकांनी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर खोचक टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूर विषयाचं गांभीर्य नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Narendra Modi was laughing and talking about the Manipur incident – Rahul Gandhi 

राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, “मणिपूरचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यावर बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात हसत होते. ही अत्यंत निंदनीय बाब आहे.

मणिपूर घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हसून बोलत होते, यावेळी बोलत असताना ते आमची थट्टा करत होते. हसून बोलायला तो काही आमचा विषय नव्हता. अविश्वास प्रस्ताव काँग्रेस पक्षाचा नव्हता, तो प्रस्ताव मणिपूरसाठी होता.”

पुढे बोलताना ते (Rahul Gandhi) म्हणाले, “राजकारणात येऊन मला तब्बल 19 वर्षे झाली आहे. मात्र, मणिपूरसारखी घटना मी आत्तापर्यंत पाहिलेली नाही.

भारतीय जनता पक्षानं मणिपूरमध्ये भारताची हत्या केली असल्याचं मी सभागृहात म्हटलं होतं. मी माझ्या या वक्तव्यावर ठाम आहे. कारण मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून लोक मरताना दिसत आहे.

त्या ठिकाणी महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे. या गंभीर प्रकरणावर पंतप्रधान मोदी संसदेत फक्त दोन मिनिटे बोलले आहे. पंतप्रधानांना ही बाब शोभत नाही.”

“मणिपूरमध्ये पंतप्रधानांनी हिंदुस्थानाची हत्या केली आहे. आपल्या भारतीय सैन्याची ताकद सगळ्यांना माहित आहे. भारतीय सैन्य दोन दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करू शकतो.

मात्र, पंतप्रधानांना ते करायचं नाही. पीएम मोदींना मणिपूरला जळत ठेवायचं आहे. त्यांना मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करायची नाही”, असही ते (Rahul Gandhi) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या