Narendra Modi | मोदी सरकारचा मोठा निर्णय! राजद्रोह कायदा केला रद्द

Narendra Modi | नवी दिल्ली: मोदी सरकारने आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज लोकसभेमध्ये भारतीय नागरिक संरक्षण संहिता विधेयक 2023, भारतीय न्याय संहिता विधेयक आणि भारतीय पुरावा कायदा विधेयक सादर केले.

यानंतर आज मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वादाच्या भोवऱ्यात असणारा राजद्रोह कायदा रद्द करण्यात आला आहे. अमित शाह यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली आहे.

The Sedition Act was introduced to protect the British rule – Amit Shah

अमित शाह म्हणाले, “आज सादर केलेल्या विधेयकांमुळे फौजदारी दंड संहितेमध्ये महत्त्वाचे बदल होऊ शकतात. त्याचबरोबर भारतीय दंड संहितेला भारतीय न्याय संहिता म्हटलं जाऊ शकतं.

ब्रिटिश राजवटीला संरक्षण प्रदान करण्यासाठी राजद्रोह कायदा बनवण्यात आला होता. मात्र, आता राजद्रोह कायदा पूर्णपणे संपवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं (Narendra Modi) घेतला आहे. त्याचबरोबर मॉब लिंचिंगपासून ते फरार गुन्हेपर्यंतच्या कायद्यांमध्ये अमुलाग्र बदल केले जाणार आहेत.”

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी गंभीर आरोप केला होता. राहुल गांधी यांनी लोकसभा आवारात महिला खासदारांना फ्लाईंग किस दिली असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडं जाऊन याबाबत तक्रार दाखल केली होती. त्याचबरोबर या प्रकरणावरून राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून देशभरात आंदोलन करण्यात आलं होतं.

या प्रकरणावरून मुंबईत देखील भाजप महिला आघाडीने आंदोलन केलं आहे. त्याचबरोबर या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.