🕒 1 min read
Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: आज पुण्यातील चांदणी चौक पुलाचे लोकार्पण होणार आहे. पुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) करणार आहे.
नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा दौरा रद्द केला असल्याचं बोललं जात आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील उपस्थित राहणार आहे.
Eknath Shinde was stuck in Chandni Chowk traffic jam
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना काही महिन्यांपूर्वी चांदणी चौक वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला होता. त्यानंतर चांदणी चौक पुलाचे काम जोमाने सुरू झाले होते.
मुख्यमंत्री शिंदे साताऱ्याकडे जात असताना चांदणी चौकात काही तास अडकले होते. मात्र, आता या पुलाचे लोकार्पण झाल्यावर चांदणी चौकातली वाहतूक कोंडी संपणार आहे.
दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांच्याबद्दल मोठा गौप्यस्पोट केला.
ते म्हणाले, “अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या खात्यात ढवळाढवळ सुरू केली आहे. अजित पवारांचा त्या खात्याशी काही संबंध नसताना त्यांनी वॉर रूममध्ये राज्यातील प्रोजेक्टचा आढावा घेतला आहे.
म्हणजेच वॉर रूममध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कॉल्ड वॉर सुरू आहे.” विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Aditya Thackeray | “खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी…”; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका
- Rahul Gandhi | “मणिपूर जळत असताना पीएम मोदी हसत…”; राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर घणाघात
- Narendra Modi | मोदी सरकारचा मोठा निर्णय! राजद्रोह कायदा केला रद्द
- Kishori Pednekar | ठाकरेंच्या चिंतेत वाढ! किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी होण्याची शक्यता
- Sanjay Shirsat | ठाकरे कुटुंबातील व्यक्ती जाणार तुरुंगात; संजय शिरसाटांचं खळबळजनक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











