Eknath Khadse | “नवाब मालिकांना भाजप ऑफर…”; एकनाथ खडसेंचं खळबळजनक विधान

Eknath Khadse | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

17 महिन्यानंतर नवाब मलिक जेलमधून बाहेर येत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात जेलमध्ये होते. वैद्यकीय कारणामुळे त्यांना दोन महिन्यासाठी जामीन देण्यात आला आहे.

नवाब मलिकांना जामीन मिळाल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Sharad Pawar is very grateful to Nawab Malik – Eknath Khadse

एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, “नवाब मलिक यांच्यावर शरद पवारांचे खूप उपकार आहे. कारण शरद पवारांनी त्यांना अनेक चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे. पवारांनी त्यांना मंत्री देखील केलं आहे.

मलिक यांनी देखील पक्षासाठी खूप मेहनत घेतली आहे. म्हणून मला वाटतं ते शरद पवारांना पाठिंबा देतील. परंतु भारतीय जनता पक्ष देखील नवाब मालिकांना ऑफर देऊ शकते.

कारण भाजपमध्ये सध्या एक मशीन आहे. त्या मशीनमध्ये कुठलीही व्यक्ती टाकली तर ती स्वच्छ होऊन बाहेर पडते आणि नंतर मंत्री होते.”

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने केलेल्या आरोपानंतर नवाब मलिक यांची चौकशी सुरू झाली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

नवाब मलिक तुरुंगात असताना राज्याच्या राजकीय वर्तुळात दोन मोठे भूकंप येऊन गेले. यामध्ये पहिला म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बंडखोरी आणि दुसरा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांचा गट कमकुवत झाल्याचं दिसून आलं आहे. अशात नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कोणत्या गटाला पाठिंबा देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.