Ashish Shelar | “समर्पणाचा सूर्य तुमच्या अहंकाराला…”; आशिष शेलारांची ठाकरे गटावर बोचरी टीका

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: आज सामना अग्रलेखाच्या (Samana Editorial) माध्यमातून ठाकरे गटानं मणिपूर मुद्द्यावरून मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.

मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संसदेत दिलं. मात्र, मोदी सूर्याचे मालक नाही, अशा शब्दात ठाकरे गटानं नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

The sun of peace will surely rise in Manipur – Ashish Shelar

आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विट करत आशिष शेलार म्हणाले, “सूर्याचे कोणीच मालक नाहीत, याची कल्पना आम्हाला आहे. पण प्रभादेवीच्या गल्लीतील बसून अग्रलेख लिहीणाऱ्या पत्रकार पोपटलाल, तुम्हाला आहे का?

◆तुमचं सरकार महाराष्ट्रात आल्यावर तुम्ही तर संपूर्ण ब्रम्हांडाचे मालक असल्यासारखे वागत होतात!
◆ तुमच्या सारखे अहंकारी आणि निराशावादी आम्ही नाही, म्हणून आम्हाला खात्री आहे की,
◆मणिपूर मध्ये शांतीचा सुर्य नक्की उगवेल
◆या देशातील गुलामगिरीची मानसिकता संपेल
◆ब्रिटिशांनी सोडलेल्या गुलामगिरीच्या खुणा पुसून अमृतकाळात देश तेजस्वी सूर्य प्रकाशात उजळून जाईल

◆तुमच्या डिक्शनरीत देशहित हा शब्द असता तर ब्रिटीशकालीन कायदे इतिहास जमा करण्याचे धाडसी पाऊल उचलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह याचे तुम्ही आज अभिनंदन केले असते. पण तुम्ही पत्रकार पोपटलालच.

◆तुम्ही म्हणजे नकारात्मकता, व्देष, तिरस्कार, कोतेपणा, स्वार्थ आणि अहंकाराने खचाखच भरलेले गोडाऊन आहात!

पण लक्षात ठेवा! 2024 ला सेवा, समर्पणाचा सूर्य उगवेल तुमच्या अहंकारी सुर्याला आणखीन मोठे ग्रहण लागेल!”

दरम्यान, आजच्या सामना अग्रलेखच्या माध्यमातून ठाकरे गटानं नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. “मणिपूर समस्येचे खापर त्यांनी पंडित नेहरूंवर फोडले. मग मागच्या दहा वर्षांत तुम्ही सत्ता भोगून काय केलेत?

मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, व्ही. पी. सिंग हे बिगर काँग्रेसी पंतप्रधान झाले व आता दहा वर्षे स्वत मोदी पंतप्रधान असूनही मणिपूरचे खापर नेहरूंवर फोडणे ही राजकीय दिवाळखोरीच.

मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढली जात असताना मोदी पंतप्रधान आहेत व लोक मोदींना जाब विचारीत आहेत. यात नेहरूंचा दोष काय?

आता मोदी म्हणतात, मणिपुरात शांतीचा सूर्य उगवेल तुम्ही सांगाल तेव्हा उगवायला सूर्य भाजपच्या मालकीचा आहे. काय?”, असं आमच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.