Sanjay Raut | देशद्रोह कायद्यावरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, “ब्रिटिशांपेक्षा भयंकर…”

Sanjay Raut | मुंबई: काल (11 ऑगस्ट) मोदी सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशद्रोह कायदा रद्द केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.

The government has made more terrible laws than the British – Sanjay Raut

प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “काल केंद्र सरकारने देशद्रोहाचा कायदा रद्द केला आहे. केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन कायदा रद्द केला आहे.

पण त्या कायद्याला मागे टाकणारे कायदे वापरून सत्ताधारी आपल्या राजकीय विरोधकांना गुंतवत आहे. राजकीय दृष्टिकोनातून ज्यांचा त्यांना भविष्यात त्रास होईल, त्यांना ते तुरुंगात टाकत आहेत.

त्यामुळं त्यांनी देशद्रोहाचा कायदा रद्द केला, यांचं जास्त कौतुक सांगू नये. ब्रिटिशांपेक्षा भयानक कायदे त्यांनी निर्माण केले आहे. ते कायदे सत्ताधारी विरोधकांना त्रास देण्यासाठी वापरत आहे. जे त्यांच्या पक्षात जातात त्यांना ते निर्मला वॉशिंग मशीन धुवून घेतात.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “सध्या महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे. अनेक महिन्यानंतर नवाब मलिक जेलमधून बाहेर येणार आहे. मात्र, जे लोक तुरुंगात जाण्याच्या वाटेवर होते.

त्यांना सत्ताधाऱ्यांनी मंत्रीपद दिलं आहे. त्यामुळं सध्या सुरू असलेल्या राजकारणातून देश हुकूमशाहीकडं चालला असल्याचं दिसत आहे.

त्यामुळं आम्ही देशद्रोहाचा कायदा मागे घेतला याची सरकारने जास्त टीमकी वाजवू नये, असं मी सरकारला आवाहन करत आहे. कारण ब्रिटिशांपेक्षा भयंकर कायद्याचा वापर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं करत आहात.”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) तब्बल 17 महिन्यानंतर जेलमधून बाहेर येणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे ते जेलमध्ये होते. वैद्यकीय कारणामुळे त्यांना दोन महिन्यासाठी जामीन देण्यात आला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “राजकारण आणि समाजकारणातील आमचे सहकारी तुरुंगातून बाहेर येत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.

त्यांना मोकळा श्वास घेता येणार आहे, त्यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. त्यांची तब्येत खराब होती आणि आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.