Share

Ajit Pawar | उचलली जीभ लावली टाळ्याला; अजित पवारांची विजय वडेट्टीवारांवर टीका

🕒 1 min readAjit Pawar | पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये कोल्ड वार सुरू असल्याचं विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं होतं. राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या खात्यात ढवळाढवळ सुरू केली आहे. त्यामुळं  मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये कोल्ड वार सुरू असल्याचं विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं होतं.

राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या खात्यात ढवळाढवळ सुरू केली आहे. त्यामुळं  मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये कॉल्ड वॉर सुरू आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे.

I did not interfere in the work of Chief Minister Eknath Shinde – Ajit Pawar 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “विजय वडेट्टीवार सध्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर विराजमान आहे. हे एक जबाबदार पद आहे. त्यामुळं त्या पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीनं जबाबदारीनं बोललं पाहिजे.

उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला, असं बोलणं योग्य नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामांमध्ये हस्तक्षेप केला नाही. अर्थमंत्री म्हणून मी प्रकल्प आणि विकास कामांचा आढावा घेऊ शकतो. त्यात तुम्हाला काय त्रास होत आहे? काय माहित.”

आज पुण्यातील चांदणी चौक पुलाचे लोकार्पण झाले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवापासूनच थोडी तब्येत खराब आहे.

आम्ही सगळ्यांनी सांगितलं, म्हणून मुख्यमंत्री शिंदे दोन-तीन दिवस आराम करत आहे. शेवटी प्रत्येकाला आपल्या तब्येतीची काळजी स्वतः घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळं सर्वांनी समजून घ्यायला हवं.”

दरम्यान, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केलं होतं. ते म्हणाले, “अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यात लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या खात्याशी अजित पवारांचा काही संबंध नसताना त्यांनी प्रोजेक्ट आणि विकास कामांचा आढावा घेतला आहे. म्हणजेच वॉर रूममध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!