Share

Nitin Gadkari | पुण्यात हवेतून चालणाऱ्या बस आणणार – नितीन गडकरी

Nitin Gadkari | पुणे: आज पुण्यातील चांदणी चौक पुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पुण्यामध्ये हवेतून चालणाऱ्या म्हणजेच … Read more

Published On: 

Nitin Gadkari | पुणे: आज पुण्यातील चांदणी चौक पुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये बोलत असताना नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पुण्यामध्ये हवेतून चालणाऱ्या म्हणजेच ‘स्काय वॉक बस’ आणणार असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

I want to ban diesel and petrol from the country – Nitin Gadkari

नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, “चांदणी चौकात या पुलाचं काम सुरू असताना अनेक अडचणी आल्या. मात्र, सर्व अडचणींना तोंड देऊन हा पूल बांधण्यात आला आहे.

नवीन तंत्रज्ञान वापरून या पुलाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

पुण्यामध्ये ‘स्काय वॉक बस’ म्हणजेच हवेत चालणारी बस सुरू करण्याची कल्पना आमच्या डोक्यात आहे. कारण देशातून मला डिझेल आणि पेट्रोल हद्दपार करायचं आहे.”

पुढे बोलताना ते (Nitin Gadkari) म्हणाले, “पुणे प्रदूषित करू नका. त्याचबरोबर पुणे शहर आता जास्त वाढवू नका. पूर्वी लहान असताना मी माझ्या बहिणीकडे स्वारगेटला राहायला यायचो. तेव्हा त्या ठिकाणी पर्वतीहून गार हवा यायची.

इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन यांचा जास्तीत जास्त वापर करा. त्याचबरोबर कचऱ्यापासून वीज निर्मिती करू नका. कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. त्यामुळं पुण्यातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.”

दरम्यान, यावेळी बोलत असताना अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “सर्वांना वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आम्ही डोळा ठेवून आहोत. मात्र, त्या खुर्चीवर सध्या एक व्यक्ती विराजमान आहे.

त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही काय बेअक्कल आहोत का? एका खुर्चीवर दोन लोकांचा डोळा असून कसं चालेल? या विषयावर मला आता भाष्य करायचं नव्हतं. मात्र आम्ही या विषयावर प्रतिक्रिया दिली नाही तर लोकांना एकच बाजू दिसते.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही