Aditya Thackeray | “अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या…”; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर खोचक टीका

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: कोकणामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. गणेश उत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. गणेश उत्सवादरम्यान प्रवाशांचा प्रवास सुखकर होणे अशक्य असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट करत राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले, “गणेशोत्सव जवळ आलाय, कोकणचा चाकरमानी बांधव कोकणात जायला निघणार आणि रस्त्यांची अवस्था मात्र चंद्रावर पडलेल्या खड्ड्यांसारखी!

प्रवास सुखकर होणं अशक्य! पालकमंत्री पदासाठी आपापासात भांडत बसलेल्या आणि अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या आमदारांना स्वतःच्या मतदारसंघातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रश्न सोडवता येत नाही? पाठीशी असलेली महाशक्तीही मदतीला येत नाही? अश्या भामट्यांना कोकणी माणूस इंगा दाखवणार!”

Ganeshotsav is starting from September 19

दरम्यान, 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळं 15 सप्टेंबर पासूनच जादा गाड्या सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. तर 23 सप्टेंबर पासून परतीसाठी जादा बसेस सोडण्यात येतील.

गणेश उत्सवादरम्यान मुंबईतून कोकणात 2200 गाड्या जास्त सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून 1550 जागा गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. यामध्ये आतापर्यंत बहुतांश गाड्यांचं आरक्षण फुल झालेलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.