Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज पुण्यातील चांदणी चौक पुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर झाली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
ट्विट करत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “पुणे येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण, खेड बायपास, मंचर बायपास व एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण तसंच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डच्या लोकार्पणाचे कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला माझ्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
The district administration made good efforts for land acquisition – Ajit Pawar
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे ही समस्या दूर करण्यात यश आलं. भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनानंही चांगले प्रयत्न केले.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, पोलीस आणि नागरिकांचंही सहकार्य लाभलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामालाही गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वनाज ते चांदणी चौक आणि वाघोलीपर्यंतही मेट्रो कमीत कमी कालावधीत पोहोचवायची आहे.
पुणे येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण, खेड बायपास, मंचर बायपास व एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण तसंच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डच्या लोकार्पणाचे कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. @nitin_gadkari जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या… pic.twitter.com/VzQQJVVNMo
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 12, 2023
पुणे शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांनी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्यानं पुणे शहराला त्याचा लाभ होणार आहे.
पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग येत असल्यानं रस्ते, मेट्रो, विमान वाहतूक अधिक सक्षम करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी नागरिकांचं सहकार्य आवश्यक आहे.
पुणे अंतर्गत चक्राकार मार्गाची जबाबदारी केंद्र सरकारनं घ्यावी, राज्य शासन आणि पुणेकर यासाठी सर्व सहकार्य करतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.”
महत्वाच्या बातम्या
- Aditya Thackeray | “अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या…”; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर खोचक टीका
- Sanjay Shirsat | “मुख्यमंत्री शिंदेंना बळजबरीने ॲडमिट…”; संजय शिरसाटांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
- Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंची बदनामी केल्यामुळे किशोर पाटलांचे समर्थक आक्रमक! पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
- Nitin Gadkari | पुण्यात हवेतून चालणाऱ्या बस आणणार – नितीन गडकरी
- Ajit Pawar | “मुख्यमंत्रीपदावर आमचा डोळा असायला…”; अजित पवार यांचं खळबळजनक विधान